महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी - bear attacked the farmer

नांदेड जिल्ह्यातील चिखली गावातील शेतकरी शेख जावेद मुबारक शेताकडे गले असताना त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आदीलाबाद (तेलंगना) येथे उपचार सुरू आहेत.

http://10.10.50.85:6060///finalout4/maharashtra-nle/finalout/06-December-2019/5283427_nanded.mp4
अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

By

Published : Dec 8, 2019, 2:24 AM IST

नांदेड -किनवट तालुक्यातील चिखली गावातील शेतकरी शेख जावेद शेख मुबारक (वय, २५) शेताकडे गेले असता अचानक त्याच्यावर अस्वलाने हल्ला करून त्याना गंभीर जखमी केले. या घटनेत शेख जावेद याच्यावर अस्वलाने शेख जावेद यांच्या चेहऱ्याचा चावा घेऊन जखमी केले. यामुळे त्यांच्या डोळ्यांना मोठी इजा झाली आहे.

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

अस्वलाच्या हल्ल्यानंतर शेख जावेद यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी पोहचून अस्वलाला हुसकावून लावत शेख जावेद यांना किनवट येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी आदीलाबाद, तेलंगना येथे पाठवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details