महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल- वडेट्टीवार

जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी तथा लोकप्रतिनिधीची बैठक घेऊन मंत्री वडेट्टीवार यांनी नुकसानीबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री वडेट्टीवार यांनी दिली.

Farmers in Nanded district will be assisted immediately said Wadettiwar
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल- वडेट्टीवार

By

Published : Oct 18, 2020, 12:17 PM IST

नांदेड - राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज सकाळीच नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतलाय. जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी तथा लोकप्रतिनिधीची बैठक घेऊन मंत्री वडेट्टीवार यांनी नुकसानीबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री वडेट्टीवार यांनी दिली.

नांदेड दाैऱ्यावर असताना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे साठ टक्क्याच्यावर नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही सत्तर टक्के विमा काढला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानासंदर्भात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून जास्तीत मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वड्डेटीवार यांनी यावेळी सांगितले.यावेळी वेगवेगळ्या विषयांवर वडेट्टीवार यांनी भाष्य केले. राज्यपाल कोश्यारी यांनी नेमका कोणत्या विचाराचा व भावनेचा चष्मा घातला आहे. हे दिसून येत आहे. राज्याच्या इतिहासात आजवर घडले नाही, असे राज्यपालाचे वर्तन व वागणूक दिसून येत आहे. हे वर्तन गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासारखे असल्याची टीकाही करत येणाऱ्या काळात त्यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.दौऱ्याची माहिती न दिल्याने शिवसेनेच्या आमदाराने व्यक्त केली नाराजीआमदार बालाजी कल्याणकर यांची स्थानिक प्रशासनावर नाराजी केली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या दौऱ्याबाबत कल्पना दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी मंत्री वडेट्टीवार यांनी आमदारांना समजावत शांत केले.

ABOUT THE AUTHOR

...view details