नांदेड - एकीकडे कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे जगातील सर्व कारखाने बंद असताना शेतकऱ्यांची परिस्थीती याउलट आहे. त्याला ना बंद, ना सुट्टी ना आराम! येणाऱ्या काळात जगाला जगविण्यासाठी अन्नधान्याचे उत्पन्न काढण्यासाठी तो कामात गुंतला आहे.
स्पेशल स्टोरी : शेतकऱ्यांसाठी ना बंद, ना सुट्टी, ना आराम; शिवारात सुरुये खरीपपूर्व मशागत... - शेती बातमी नांदेड
दळण-वळण बंद झाल्यामुळे शेतमालाचे भाव प्रचंड खाली कोसळले. यातून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. जगातील कितीही संकटे शेतकऱ्यांवर कोसळली तरी मागे न हटता परिस्थितीशी तो दोन हात करतच असतो. यातच, रब्बी हंगाम संपतो ना संपतो शेतकरी उन्हा-तान्हात खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.
शेतकऱ्यांच्या शिवारात सध्या भरउन्हात खरीपपूर्व हंगामाची तयारी सुरू आहे. जगावर कुठलेही संकट येवो त्याचा पहिला मार शेतकऱ्यांच्या माथी असतो. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, कधी अवकाळीचे संकट हे नित्याचेच असते. यातून कसे-बसे उत्पन्न काढले तर योग्य दर मिळत नाही. आता कोरोनाचे संकट आल्यानंतर पहिला फटका हा शेतकऱ्यांनाच बसला आहे. दळण-वळण बंद झाल्यामुळे शेतमालाचे भाव प्रचंड खाली कोसळले. यातून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. जगातील कितीही संकटे शेतकऱ्यांवर कोसळली तरी मागे न हटता परिस्थितीशी तो दोन हात करतच असतो. यातच, रब्बी हंगाम संपतो ना संपतो शेतकरी उन्हा-तान्हात खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.
सध्या शेतामध्ये शेतकरी खरीपपूर्व मशागतीत गुंतला आहे. नांदेड जिल्ह्यात हरभरा, गहू, ज्वारी आदी पिकांचा हंगाम संपला असून शेतामध्ये नांगरणी-वखरणी सुरू आहे. जून महिन्यात मृग नक्षत्रात वेळेवर पाऊस झाला तर पेरणीत मागे पडू नये यासाठी शेतकऱ्यांनी आपली तयारी सुरू ठेवली आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात डॉक्टर व पोलीस यांचे काम परोपकारी आहे. यानंतरही एक महत्वाचा घटक म्हणजे शेतकरी येतो. जगाला अन्न पुरविण्याचे काम बळीराजा करत असून त्यांच्या कष्टाचं चीज कधी तरी व्हावं हीच अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.