महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून नांदेडमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - नांदेड न्यूज

कर्जबाजारीपणा व सततच्या नापिकीस कंटाळून मलकागुडा येथील तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश भीमराव नीळकंठवार (वय 38 वर्षे ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

गणेश भिमराव निळकंठवार
गणेश भिमराव निळकंठवार

By

Published : Feb 21, 2020, 5:50 PM IST

नांदेड - कर्जबाजारीपणा व सततच्या नापिकीस कंटाळून मलकागुडा येथील तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. बँका आणि फायनान्स कंपन्यांनी कर्जासाठी लावलेला तगादा आणि कर्ज कसे फेडणार, या चिंतेमुळे आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समजत आहे. गणेश भीमराव नीळकंठवार (वय 38 वर्षे ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

गणेश नीळकंठवार यांची हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ व वारंग टाकळी येथे शेतजमीन आहे. शेतजमिनीवर भारतीय स्टेट बँकेसह महाराष्ट्र ग्रामीण बँक व फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. सततच्या नापिकीमुळे या कर्जाची परतफेड कशी करावी, सोबतच मुलींच्या लग्नाच्या चिंतेमुळे मागील अनेक दिवसांपासून ते मानसिक तणावात होते. यातच गुरुवारी पत्नी व मुली आदिलाबाद जिल्ह्यातील मुतनूर येथे असल्याची व आई वडील पाहुण्यांकडे गेल्याची वेळ साधून त्यांनी आत्महत्या केली आहे.

दरम्यान, गुरुवारी रात्री 10 वाजून 11 मिनिटांनी व्हॉटसअ‌ॅप ग्रुपवर माझ्या मरणास कुणीही जबाबदार नाही. मला माफ करा, असा मेसेज टाकून अवघ्या काही मिनिटांतच गळफास घेवून त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी मृताचे वडील भीमराव गणपत नीळकंठवार यांनी दिलेल्या माहितीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details