नांदेड - जिल्ह्यातील सावरगाव (ता.अर्धापूर) येथील ज्ञानेश्वर नारायणराव आबादार (वय३५) या शेतकऱ्याने कर्ज व नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 1 फेब्रुवारीला घडली.
कर्ज व नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - farmer suicide nanded
अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर नारायणराव आबादार यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एक लाख रुपयांचे कर्ज होते.
ज्ञानेश्वर नारायणराव आबादार
अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर नारायणराव आबादार यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एक लाख रुपयांचे कर्ज होते. तसेच खरीप हंगामातील हाताला आलेली पिके गेली, तर रब्बी हंगामातील पिकेही ढगाळ वातावरणामुळे संकटात आली होती. या विवंचनेत या शेतकऱ्याने स्वतःच्या राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात वडील, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परीवार आहे.