महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड : हिमायतनगर तालुक्यात वीज कोसळून शेतमजुराचा मृत्यू - nanded lightning strike news

सरसम शिवारात रविवारी सायंकाळच्या सुमारास वीज पडून एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुभाष दिगांबर गुंडेकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

हिमायतनगर तालुक्यात वीज कोसळून शेत मजूराचा मृत्यू
हिमायतनगर तालुक्यात वीज कोसळून शेत मजूराचा मृत्यू

By

Published : Jun 14, 2020, 10:42 PM IST

नांदेड - जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील सरसम शिवारात रविवारी सायंकाळच्या सुमारास वीज पडून एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुभाष दिगांबर गुंडेकर (वय ४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

सालगडी सुभाष गुंडेकर हा शेतीकाम करण्यासाठी विजय देशमुख यांच्या शेतात होता. रविवारी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान मेघगर्जनेसह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, तो आश्रयासाठी जवळच बाभळीच्या झाडाखाली बैलगाडीजवळ थांबला. दरम्यान, कडाडून वीज कोसळली आणि त्यात गुंडेकर याचा जागीच मृत्यू झाल.

या घटनेमुळे सरसम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृताच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, आई, वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे. शासनाकडून मृताच्या कुटुंबियास आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details