महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमधील करंजी येथे सर्पदंशाने शेतकर्‍याचा मृत्यू - विषारी साप

जिल्ह्यातील करंजी येथे सर्पदंशाने एका शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (२६ जुलै) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील परमेश्वर किशन जाधव (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

नांदेडमधील करंजी येथे सर्प दंशाने शेतकर्‍याचा मृत्यू

By

Published : Jul 26, 2019, 6:47 PM IST

नांदेड - जिल्ह्यात सर्प दंशाने एका शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (२६ जुलै) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील परमेश्वर किशन जाधव (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

परमेश्वर जाधव हे खत टाकण्यासाठी आपल्या शेतात गेले होते. खत टाकून झाल्यानंतर पावसाने अंग ओले झाले म्हणून अंगावरील कपडे वाळवण्यासाठी त्यांनी आपल्या झोपडीत शेकोटी पेटवली. ऊब निर्माण झाल्याने अचानक बाहेर आलेल्या विषारी सापाने बेसावध असणाऱ्या जाधव यांच्या पायाला जबर चावा घेतला. या घटनेनंतर उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

परमेश्वर जाधव यांचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंनतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, ४ मुली असा परिवार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details