नांदेड - दुचाकीवरून अंत्यविधीला जाणाऱ्या शेतकऱ्याला ट्रकने चिरडल्याची घटना नांदेड-हिंगोली महामार्गावर घडली आहे. या अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत शेतकरी दुचाकीवरून चोरंबा (ता. अर्धापूर) येथे अंत्यविधीला जात असताना वारंगाकडून विरुध्द दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघाताची ही घटना मंगळवारी (दि 18) दुपारच्या सुमारास झाला. याप्रकरणी ट्रक चालका विरुद्ध मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अंत्यविधीला जाताना काळाचा घाला, दुचाकीवरून जाणाऱ्या शेतकऱ्याला ट्रकने चिरडले - शेतकऱ्याला ट्रकने चिरडले
दुचाकीवरून अंत्यविधीला जाणाऱ्या शेतकऱ्याला ट्रकने चिरडल्याची घटना नांदेड-हिंगोली महामार्गावर घडली आहे. या अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
हेही वाचा -मांडुळाची तस्करी करणाऱ्या चौघांच्या आवळल्या मुसक्या
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मेंढला येथील शेतकरी शंकर धोंडजी वानखेडे (वय 58) हे आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीला दुचाकीवरून (एम एच 26 - 8205) मंगळवारी दुपारी चोरंब्याला जात होते. त्यांची दुचाकी चोरंबा पाटीजवळ आली असता वारंगाकडून विरुध्द दिशेने येणा-या भरधाव ट्रकने (एम एच 29 - 0523) धडक दिली. यात शंकर वानखेडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मनाठा पोलीस ठाण्याचे जमादार तिडके यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून मनाठा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मुंडे करत आहेत.