महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या; लोहा तालुक्यातील घटना - शेतकरी आत्महत्या

कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ यामुळं कर्जबाजाराला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. सावरगाव नसरत येथील हरी सटवा बोईनवाड यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली.

farmer commits suicide by poisoning
शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या

By

Published : Oct 1, 2020, 4:46 PM IST

नांदेड- सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून लोहा तालुक्यातील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. तालुक्यातील सावरगाव नसरत येथील हरी सटवा बोईनवाड (वय ४२ वर्षे) यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली.

कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळा यामुळं बळीराजा हतबल झाला आहे. तालुक्यात सर्वत्र पिकं जोमात आली असताना ऐन काढणीच्या वेळी अतिवृष्टी झाली, आणि हाताशी आलेलं पीक भुईसपाट झालं. लॉकडाऊनमुळे सहा महिन्यापासून हाताला काम नाही. घरावर आलेली उपासमारीची वेळ आता जीवन कसे जगावे या विवंचनेतून मंगळवारी विष प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांच्या पाश्चात्य आई, वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी माळाकोळी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details