महाराष्ट्र

maharashtra

राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने आरोग्य सेवकांच्या सुरक्षिततेसाठी फेस शिल्ड मास्कचे वितरण

By

Published : May 20, 2020, 9:49 PM IST

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. सचिन जाधव यांच्या पुढाकाराने 18 मे रोजी नांदेड जिल्ह्यातील तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्या सेवकांना 3 हजार 750 फेस शिल्डचे वितरण करण्यात आले.

nanded ncp
राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने आरोग्य सेवकांच्या सुरक्षिततेसाठी फेस शिल्ड मास्कचे वितरण

नांदेड -कोरोनाचा प्रादुर्भाव आज सर्वत्र वाढत आहे. मागील दोन महिन्यात शहरी भागात कोरोनाच्या रुग्णामध्ये खूप वाढ होत आहे. हे लक्षात घेत कोरोनाचा प्रादूर्भाव ग्रामीण भागात वाढ होऊ नये म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडून वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत करण्यात आली. पक्षाच्या वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोनाशी लढा देणार्‍या डॉक्टर, नर्सेस, आशा सेविका यांच्या सुरक्षिततेसाठी फेस शिल्ड मास्कचे वितरण करण्यात आले.

राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने आरोग्य सेवकांच्या सुरक्षिततेसाठी फेस शिल्ड मास्कचे वितरण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, डॉक्टर सेल प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिल कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या तर्फे नांदेडसह संपूर्ण राज्यभरात फेस शिल्ड मास्कचे वितरण केले जात आहे.

नांदेड जिल्ह्यात यापूर्वी 2 हजार 350 फेस शिल्डचे वितरण करण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. सचिन जाधव यांच्या पुढाकाराने 18 मे रोजी नांदेड जिल्ह्यातील तालूका स्तरावर ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्या सेवकांना 3 हजार 750 फेस शिल्डचे वितरण करण्यात आले. अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर प्राथमिक केंद्र, पार्डी (म.), मालेगाव, कोंढा, कामठा, लोण, लहान, देगाव, दाभड, पिंपळगाव येथे वाटप करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details