महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा ढकलल्या पुढे - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परीक्षा बातमी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा 6 ऑक्टोबरपासून होणार होत्या. मात्र, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या लेखणी बंद आंदोनलामुळे परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या असून नवीन वेळापत्रक लकरच जाहीर होणार आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड

By

Published : Sep 30, 2020, 10:50 PM IST

नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी 2020 च्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा 6 ऑक्टोबरपासून घेण्याचे निश्चित झाले होते. पण, विद्यापीठातील शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 24 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या लेखणी बंद आंदोलनामुळे परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या 30 सप्टेंबरच्या तातडीच्या बैठकीतील ठरावानुसार 6 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पदवी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे परिपत्रक विद्यापीठाचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे यांनी काढले आहे.

यासर्व परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक लवकरच विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. उन्हाळी-2020 च्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या तारखेतील बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य यांनी सदर बाब आपल्या महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या निर्देशनास आणून द्यावी, असेही परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details