नांदेड - कोरोना महामारी आणि लॉकडाऊनपूर्वी नांदेडच्या सचखंड गुरुद्वारामध्ये दररोज वीस ते पंचवीस हजार भाविक देश-विदेशातून येत असत. मात्र, कोरोना काळात भाविकांना गुरुद्वारात दर्शन नकारण्यात आले. त्यानंतर, आता दिवाळी पाडव्यापासून राज्यातील धार्मिक स्थळांना सुरू करण्याची परवनागी मिळाली. या पार्श्वभूमीवर सचखंड गुरुद्वारामध्ये सद्यस्थितीत दररोज सात ते आठ हजार भाविक दर्शनासाठी येत असल्याचे समजले आहे.
सध्या दिल्ली आणि पंजाब येथून विमानसेवा सुरू झाली आहे. तसेच, रेल्वेसेवाही सुरू झाली आहे. त्यामुळे, थोड्या प्रमाणात इतर राज्यातील व जिल्ह्यातील भाविक गुरुद्वारात दर्शनासाठी येत आहेत. साधारणतः तीन हजारच्या आसपास जिल्ह्याबाहेरील, तर जिल्ह्यातील चार ते पाच हजार भाविक दर्शनासाठी येत आहेत.