नांदेड- मालेगाव रस्त्यावरील जैन मंदिर परिसरात तयार करण्यात आलेल्या पुलाच्या निकृष्ट कामाप्रकरणी महानगरपालिकेचे उपअभियंता संदीप पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. मनपा आयुक्त लहुराज माळी यांनी ही कारवाई केली आहे.
नांदेड: निकृष्ट दर्जाचे काम केल्याप्रकरणी महापालिकेतील उपअभियंता निलंबित - engineer suspended in nanded
महापालिकेने १० ते ११ डिसेंबर दरम्यान मालेगाव रस्त्यावर जैन मंदिर कॉर्नरवर एका गटारवाहिनीवर पुलाचे काम केले होते. अवघ्या चौथ्या दिवशीच या पुलावरुन वाहन जात असताना हा पूल कोसळला. या कामाची जबाबदारी असलेल्या प्रभारी उपअभियंता संदीप पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

महापालिका
निकृष्ट दर्जाच्या कामाप्रकरणी महापालिकेतील उपअभियंता निलंबित
महापालिकेने १० ते ११ डिसेंबर दरम्यान मालेगाव रस्त्यावर जैन मंदिर कॉर्नरवर एका गटारवाहिनीवर पुलाचे काम केले होते. अवघ्या चौथ्या दिवशीच या पुलावरुन वाहन जात असताना हा पूल कोसळला. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती.
त्यानंतर चौकशीअंती या कामाची जबाबदारी असलेल्या प्रभारी उपअभियंता संदीप पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.