महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाईट का घालवलीस म्हणून अर्धापुरात कर्मचाऱ्यास मारहाण, कार्यालयातील साहित्याची तोडफोड - beaten up

सोमवारी रात्री अर्धापुर उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या 220 केव्ही वाघाळा उपकेंद्रात बिघाड झाल्याने अर्धापूर शहरातील वीजपुरवठा रात्री खंडीत झाला होता. यावेळी रात्री सचिन उत्तमराव देशमुख अर्धापूर उपकेंद्रात आले. त्यांनी तेथे कर्तव्यावर उपस्थित असलेल्या अब्दूल रहीम पी. शेख बशीर या प्रधान तंत्रज्ञास लाईट कशी गेली? असा प्रश्न करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

अर्धापुरात लाईट का घालवलीस म्हणून कर्मचाऱ्यास मारहाण, कार्यालयातील साहित्याची तोडफोड

By

Published : Jul 9, 2019, 8:43 PM IST

नांदेड - अर्धापूर शहरातील 33 केव्ही उपकेंद्रातील खुर्च्या, टेबलची तोडफोड करत उपस्थित कर्मचाऱ्याला लाईट का घालवलीस म्हणून मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी मारहाण करणारे सचिन उत्तमराव देशमुख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्धापुरात लाईट का घालवलीस म्हणून कर्मचाऱ्यास मारहाण, कार्यालयातील साहित्याची तोडफोड


याप्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री अर्धापुर उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या 220 केव्ही वाघाळा उपकेंद्रात बिघाड झाल्याने अर्धापूर शहरातील वीजपुरवठा रात्री 7 वाजून 44 च्यासुमारास खंडीत झाला होता. यावेळी रात्री 8 वाजून 15 च्यासुमारास सचिन उत्तमराव देशमुख अर्धापूर उपकेंद्रात आले. त्यांनी तेथे कर्तव्यावर उपस्थित असलेल्या अब्दूल रहीम पी. शेख बशीर या प्रधान तंत्रज्ञास लाईट कशी गेली? असा प्रश्न करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. लाईट वाघाळा उपकेंद्रातून गेली आहे. एका तासात येईल असे सांगूनही काहीही न ऐकता सचिन देशमुख याने मारहाण करणे चालूच ठेवले. याप्रसंगी सोडवण्यास गेलेले दुसरे कर्मचारी अभिजीत पाठक यांनाही मारहाण झाली.यावेळी उपकेंद्रातील खुर्च्या व टेबलाची नासधूस करत शासकीय कामात दहशत निर्माण करून अडथळा निर्माण केला. या प्रकरणी सचिन उत्तमराव देशमुख यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याबाबत कलम 353, 323, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details