नांदेड - वीज पुरवठा करणाऱ्या डीपीवर काम करण्यासाठी गेलेल्या वीज कामगाराचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी मौजे रावणगाव (ता. हदगाव) शिवारात घडली. या दुर्दैवी घटनेत अवधूत नागोराव शेट्टे (50 रा.जांभळा) या वीज कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नांदेडमध्ये शॉक लागल्याने वीज कामगाराचा मृत्यू.... हेही वाचा... औरंगाबादेत सातवीतील विद्यार्थिनीला शिक्षकानेच दाखवले पॉर्न व्हिडिओ; गुन्हा दाखल
अवधूत शेट्टे हे रावणगाव शिवारातील मुलासिंग राठोड यांच्या शेतातील इलेक्ट्रीक दुरुस्तीचे काम करीत होते. शेट्टे हे इलेक्ट्रीक पोलच्या डीपीवर चढून काम करत असताना त्यांना वीजेचा शॉक लागला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. रावणगावचे पोलीस पाटील बालाजी कडबे यांनी याबाबत मनाठा पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा... '...त्यालाही पेट्रोल टाकून जाळा, पीडितेच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया'