महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उमरी शहरासह १० गावांचा वीजपुरवठा तब्बल ७२ तासानंतर सुरळीत - गोरठा

चक्रीवादळाच्या तडाख्याने मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास उमरी शहर व तालुक्यातील महावितरण कंपनीचे जवळपास २०० खांब पडले होते. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर महावितरण कंपनीतील अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन वीजपुरवठा ७२ तासानंतर सुरळीत केला.

उमरी शहरासह १० गावांचा वीजपुरवठा तब्बल ७२ तासानंतर सुरळीत

By

Published : Jun 10, 2019, 10:53 AM IST

Updated : Jun 10, 2019, 12:04 PM IST

नांदेड - चक्रीवादळाच्या तडाख्याने मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास उमरी शहर व तालुक्यातील महावितरण कंपनीचे जवळपास २०० खांब पडले होते. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर महावितरण कंपनीतील अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन वीजपुरवठा ७२ तासानंतर सुरळीत केला.

उमरी शहरासह १० गावांचा वीजपुरवठा तब्बल ७२ तासानंतर सुरळीत

वादळाच्या तडाख्याने ३३ केव्ही उपकेंद्राला जोडणारे ४५ खांब, उच्च दाब वाहिनीचे जवळपास ४० खांब, ११ केव्हीचे २४ खांबासह जवळपास २०० खांब जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे शहरासह तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी. एम. मेहर, उमरी येथील अभियंता एन. डी. लोणे, सुनील कासनाळे यांच्यासह ५० कर्मचारी व अधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन मंगळवारी रात्री ८ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा शुक्रवारी रात्री ८ वाजता सुरळीत केला. परंतु ग्रामीण भागातील वीज पुरवठा काही प्रमाणात खंडित होता तोही सुरळीत करण्यात आल्याचे अधिकारी कासनाळे यांनी सांगितले.

१३२ केव्ही उपकेंद्र, ३३ केव्ही उपकेंद्र, ११केव्ही उपकेंदाअंतर्गत ५ उपकेंद्र येतात. त्यातील उमरी शहर, ढोलउमरी, सिधी, करकाळा, मोघाळी या उपकेंद्रातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. हिरडगाव, लोखंडी, वाघाळा, तळेगाव, गोरठा, चिंचाळा या गावांना जोडणारे खांबही वादळी वाऱ्याने तुटून पडले होते. वीज प्रवाह असलेल्या तारा बाजूला काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे काही भागातील वीजपुरवठा शनिवारी सुरु झाला नव्हता. वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणचे लोखंडी व सिमेंटचे थांब तुटून पडले आहेत. ते उभे करणे आणि वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ४ वेगवेगळी पथके कामाला लागली आहेत. वादळी वाऱ्याचा तडाखा एवढ्या मोठ्या प्रमाणात बसण्याची तालुक्यातील पहिलीच वेळ आहे. एवढी मोठी घटना होऊन प्रचंड आर्थिक नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

उमरी शहरातील व्यंकटेश नगर, रापतवार नगर तसेच जुन्या उमरी भागातील अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाली असून अनेकांच्या घराची पडझड झाली आहे. ग्रामीण भागात शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. शहर व तालुक्यात वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला असून घटनेत नुकसान झालेल्या शेती व पडझडीचे पंचनामे करण्याचे काम चालू आहे. पंचनामे झाल्यानंतर अहवाल तयार केला जाईल. त्यानंतरच किती नुकसान झाले आहे, याची माहिती समोर येईल, असे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले.

Last Updated : Jun 10, 2019, 12:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details