नांदेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील विविध १ हजार ३०० सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अमोल यादव यांनी दिली आहे.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेसह १३०० सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर....! - Nanded bank election
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील ७०० सेवा सहकारी सोसायटी, नागरी पतसंस्था व अन्य सहकारी संस्था अशा एकूण १ हजार ३०० सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
![नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेसह १३०० सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर....! नांदेड सहकारी बँक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-07:55:42:1601475942-mh-ned-01-ndccsah1300sansthachyanivadnukalanbniwar-foto-7204231-30092020184738-3009f-1601471858-1075.jpg)
नांदेड सहकारी बँक
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजीच्या आदेशान्वये लॉकडाऊन कालावधी ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. अद्यापही कोरोना संसर्ग सुरूच आहे. रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सहकारी संस्था निवडणुका घेणे उचित होणार नसल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील ७०० सेवा सहकारी सोसायटी, नागरी पतसंस्था व अन्य सहकारी संस्था अशा एकूण १ हजार ३०० सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.