नांदेड -महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवडणूक येत्या २६ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना पिठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत केले आहे. 26 डिसेंबरला सकाळी ११ पासून त्यांनी निवडणूक प्रक्रिया घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
नांदेड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडणूक 26 डिसेबरला होणार... हेही वाचा... VIDEO: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विरोधीपक्षाला टोलेबाजी...
स्थायी समितीत काँग्रेसचे १५ व भाजपचे १ सदस्य असे एकूण १६ सदस्य आहेत. गेल्या २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या महापालिकेच्या सभेत स्थायी समितीला दोन वर्षे पूर्ण झाल्यामुळे निवृत्त होणाऱ्या आठ पैकी सात सदस्यांची नव्याने निवड करण्यात आली. हे सातही सदस्य काँग्रेसचे आहेत. भाजपच्या सदस्यांची मात्र अंतर्गत गटबाजीमुळे निवड झाली नाही.
हेही वाचा... ठाणे : भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा, 24 तास पाणीपुरवठा बंद
स्थायी समितीत भाजप सदस्याचे नाव विरोधी पक्ष नेत्यांनी द्यायचे असते. परंतु सर्वसाधारण सभेच्या दोन दिवस आधीच सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षनेता नियुक्ती रद्द करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. तत्पूर्वी स्थगिती मिळालेल्या विरोधी पक्षनेत्या गुरुप्रितकौर सोडी यांनी स्वतःचे तर भाजपचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी इंदबाई घोगरे यांचे नाव स्थायी समिती सदस्य पदासाठी महापौरांकडे दिले होते. दोन वर्षापूर्वी विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती नसताना आपण दिलेले नाव सभेने स्वीकारले असल्याने तीच पद्धत आता अवलंबावी, अशी मागणी सोडी यांनी केली.
हेही वाचा... आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस उपायुक्ताने गायले राष्ट्रगीत!
दुसरीकडे भाजपकडून दुसऱ्या सदस्याच्या नावाचे पत्र महापौरांकडे दाखल झाल्यामुळे कायदेशीर बाबी लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार महापौरांना देण्यात आले. भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसच्याच नव्या सात सदस्यांसह पूर्वीच्या आठ अशा एकूण १५ सदस्यांची नावे विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आली. त्यामुळे भाजपच्या सदस्याविना आणि १५ सदस्यांच्या उपस्थितीतच ही निवड प्रक्रिया घेतली जाणार आहे.
स्थायी समितीतील सदस्य
ज्योती किशन कल्याणकर, करुण भीमराव कोकाटे, दयानंद नामदेव वाघमारे, राजेश लक्ष्मीनारायण यन्नम, पूजा बालाजी पवळे, अ. रशिद अ. गणी, फारुख हुसेन कासीम पिरान, श्रीनिवास नारायणराव जाधव, अपर्णा ऋषीकेश नेरलकर, ज्योती सुभाष रायबोळे, नागनाथ दत्तात्रय गड्डम, बापुराव नागोराव गजभारे, अमितसिंह गोपालसिंह तेहरा, दीपाली संतोष मोर , शबानाबेगम मो. नासेर.