महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अटी-तटीची लढाई - nanded-district-central-co-operative-bank

गेल्या निवडणुकीत काँग्रेसला एकटे पाडून भाजप - शिवसेना व राष्ट्रवादीने बाजी मारली होती. त्यामुळे काँग्रेसला बँकेत विरोधकांची बाजू मांडावी लागली होती.

नांदेड जिल्हा मध्यर्ती बँक
नांदेड जिल्हा मध्यर्ती बँक

By

Published : Mar 26, 2021, 7:42 PM IST

नांदेड -जिल्हा बँक निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा बँक निवडणूक बिनविरोधसाठी बैठका घेण्यात आल्या होत्या. महाविकास आघाडीचे समर्थ पॅनल व भाजपच्या सहकार पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. बहुतांश ठिकाणी 'वन - टू - वन' फाईट होत असल्याने बँकेची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याची चिन्हे आहेत.

मागच्या निवडणूकीत शिवसेना राष्ट्रवादीची बाजी
बिनविरोध निवड झालेल्या गटाव्यतिरीक्त अन्य मतदारसंघात प्रत्येक उमेदवाराला प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागणार आहे. जिल्ह बँकेच्या निवडणुकीत कोणता पक्ष कोणत्या पक्षाची गळाभेट घेईल हे तसे निश्चित नसते. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला एकटे पाडून भाजप - शिवसेना व राष्ट्रवादीने बाजी मारली होती. त्यामुळे काँग्रेसला बँकेत विरोधकांची बाजू मांडावी लागली होती. माजी अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर आणि विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी महाविकास आघाडी स्थापन करून बँकेच्या चाव्या हाती घेतल्या होत्या.

बिनविरोधसाठी समन्वय नाही यंदा समीकरण थोडे बदलेले आहे. काँग्रेसचे बाळासाहेब रावणगावकर, भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर आणि शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर हे तीन पक्षाचे तीन पुढारी बिनविरोध निवडून आले असले तरी अन्य जागांसाठी तडजोड होऊ शकली नाही. बिनविरोधसाठी राजकीय पुढाऱ्यांच्या बैठका झाल्या असल्या तरी त्यांच्यात समन्वय होऊ शकला नाही.

महाआघाडीने समर्थ पॅनल मैदानात
अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी बोलणी फिस्कटली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काँग्रेसला तडजोड नको होती की भाजपला गरज वाटली नाही हा विषय बाजूला ठेवला तरी काँग्रेस-सेना-राष्ट्रवादी या महाआघाडीने समर्थ पॅनल मैदानात उतरविले आहे.

दोन्ही पॅनलमध्ये 'वन - टू - वन' फाईट
त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने सहकार पॅनल तयार केले आहे. बहुतांश जागेवर या दोन्ही पॅनलमध्ये 'वन - टू - वन' फाईट होणार आहे. सरळ लढतीमुळे उमेदवाराला प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागणार आहे. नांदेड जिल्ह्यात विविध राजकीय पुढारी त्यांच्या-त्यांच्या भागावर प्रभुत्व जमवून आहेत . त्यांच्याकडूनही आपलाच उमेदवार निवडून आणण्याचा दबाव असणार आहे .

काँग्रेसचा हेलिकॉप्टर चालणार की भाजपचा रोडरोलर
बुधवारी झालेल्या चिन्ह वाटपात महाआघाडीने हेलिकॉप्टरला पसंदी दिली असताना भाजपने रोडरोलर हे चिन्ह घेतले आहे. एक हवेत चालणारे वाहन आहे तर दुसरे जमिनीवर चालणारी अवजड गाडी आहे. ही दोन्ही वाहने शक्तिशाली म्हणून ओळखली जात असताना ते घेऊन चालणारे दोन्ही विरोधी गट बाहुबली असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हेलिकॉप्टर चालणार की रोडरोलर पळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details