महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये कार चालकाचा ताबा सुटल्याने आठ जण गंभीर जखमी - Nanded car accident

समोरुन भरवेगात येत असलेल्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने कार खड्ड्यात कोसळली. ही घटना नांदेड ते भोकर मार्गावर आमराबाद पाटीजवळ गुरुवारी घडली.

car accident in Nanded
नांदेडमध्ये कार चालकाचा ताबा सुटल्याने आठ जण गंभीर जखमी

By

Published : Jan 30, 2020, 10:58 PM IST

नांदेड- समोरून भरधाव वेगात येत असलेल्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने कार खड्ड्यात कोसळली. ही घटना नांदेड ते भोकर मार्गावर आमराबाद पाटीजवळ ३० जानेवारीला घडली.

या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील ८ जण गंभीर जखमी झाले. विजयवाडा नंदीग्राम येथील मूळचे रहिवाशी असलेले आम्लपुरपू कुटुं ३० जानेवारीला भोकरहून भोकर फाटाकडे जात होते. समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात चालकाचा कारवरील ताबा सुटला व कार खड्डयात कोसळली. यात आठ जण गंभीर जखमी झाले.

जखमीमध्ये सत्यवती सिहेच (६०), प्रिती कृष्णकुमार आम्लपुरपू, (१२), दिपीका आम्लपुरपू (३५), वीरभद्र आम्लपुरपू (८३), महेश लक्ष्मी (१२), कार्तिकेय आम्लपुरपू (१३), कृष्णकुमार वीरभद्र आम्लपुरपू (४०) व नरेश मारांम (२९) सर्व रा. विजयवाडा, नंदीग्राम, (आंध्रप्रदेश) या आठ जणांचा समावेश आहे. सदर घटनेची माहिती मिळताच महामार्गाचे पोलीस कर्मचारी रामोड व वसंत शिनगारे यांनी घटनास्थळी रुग्णवाहिकेद्वारे धाव घेऊन जखमींना विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

ABOUT THE AUTHOR

...view details