गुंठेवारी प्रकरणाविषयी माहिती देताना अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम नांदेड : नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील गुंठेवारी विभागाला आग लागून अनेक संचिका जळून खाक झाल्या. त्यानंतर काही दिवसांतच महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचे पुढे आले. या प्रकरणात चौकशी करून मनपाच्या वतीने वजिराबाद ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर प्रकरण विधि मंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही चर्चिले गेले. दरम्यान आता गुंठेवारी अनुषंगाने सविस्तर माहिती ईडीकडून मागविण्यात आली आहे.
दोन अधिकाऱ्यांची भेट : नागपूर येथून आलेल्या ईडीच्या दोन अधिकायांनी वजिराबाद ठाणे आणि महानगरपालिकेत जाऊन बोगस गुंठेवारी प्रकरणाची चौकशी केली, तसेच या प्रकरणात महापालिकेने बनावट स्वाक्षरीच्या अनुषंगाने दाखल केलेल्या गुन्ह्याचीही माहिती सदर अधिकाऱ्यांनी घेतली.
माहिती मागितल्याचे पत्र : ईडीच्या अधिकाऱ्यांनी मागितलेली माहिती देणार महापालिकेत ठेवारी प्रकाशामध्ये जे भरण्यात येणारे शुल्क आहे त्याच्या बनावट पावत्या आणि स्वाक्षरीप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या संदर्भामध्ये सोमवारी केंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचालनालय (ईडी) नागपूर विभागाचे अधिकारी आले होते. त्यांनी गुन्ह्याच्या संदर्भामध्ये माहिती मागितल्याचे पत्र दिले आहे. त्यानुसार मागीतलेली माहिती ईडीला देण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी सांगितले
ईडीचे अधिकारी वजिराबाद पोलीस स्टेशनला : पोलिस ठाण्यात दाखल केंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचालनालय (ईडी) नागपुर विभागाच्या अधिकान्यांनी महापालिकेचे आयुक्त डॉ सुनिल लहाने यांची भेट घेवून पुढील तपासासाठी वजिराबाद पोलिस ठाण्यात दाखल झाले गुंठेवारी प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत माहिती जाणून घेतली. पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी ईडीच्या अधिकायांना गुन्ह्यासंदर्भात माहिती दिली त्यामुळे बोगस गुंठेवारी बनावट पावत्यांचे हे प्रकरण किती गंभीर आहे. यावरून स्पष्ट होते.