नांदेड - विदर्भासह मराठवाड्यात शुक्रवारी सायंकाळी भुकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंपाचा धक्का ३.९ रिश्टर स्केलचा होता. या भूकंपामुळे कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती आत्तापर्यंत हाती आलेली नाही. मराठवाड्यात नांदेड हिंगोली तर विदर्भात अमरावतीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती सुत्रांनी दिली.
नांदेड -
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, हदगाव, गणेशपूर, अर्धापूर, माहूर तसेच किनवट तालुक्यातील अनेक गावात भूकंपाचे धक्के बसले आहेत. माहूर व किनवट तालुक्यातील अनेक गावात मोठा आवाज होऊन भूकंपाचा धक्का जाणवल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
यवतमाळ -