महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किनवट अन् माहूर तालुक्यात महसुली सेवा सुविधा गतीमान पद्धतीने पोहोचाव्यात - पालकमंत्री - nanded news

तेलंगाणाच्या सिमेवर असलेल्या किनवट व माहूर तालुक्यात महसुली सेवा सुविधा गतीमान पद्धतीने पोहोचाव्यात यासाठी किनवट येथील नवीन प्रशासकीय इमारत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

c
छायाचित्र

By

Published : Aug 15, 2021, 9:04 PM IST

नांदेड- सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात शासनाच्या सेवा सुविधा प्रभावीपणे पोहचविल्या जाव्यात यासाठी वेळोवेळी आपण दक्षता घेत आलो आहोत. तेलंगाणाच्या सिमेवर असलेल्या किनवट व माहूर तालुक्यात महसुली सेवा सुविधा गतीमान पद्धतीने पोहोचाव्यात यासाठी किनवट येथील नवीन प्रशासकीय इमारत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. किनवट येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या ई-लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आदिवासी भागाला आपतकाल प्रसंगी तात्काळ संपर्कात राहावे यासाठी उपलब्ध असलेल्या विमानतळाच्या धावपट्टीचे काम नव्याने पूर्ण करुन देऊ, अशी घोषणा मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

जिल्ह्यातील 16 तालुके 8 उप विभागीय कार्यालये ई-प्रणालीद्वारे जोडले...!

जिल्ह्यातील 16 तालुके 8 उप विभागीय कार्यालये ई-प्रणालीद्वारे जोडले आहेत. या प्रणालीद्वारे आज आपण वेगवेगळ्या ठिकाणी असूनही एकमेकांच्या संपर्कात आहोत. तेलंगाणा सीमेवर असलेल्या किनवट सारख्या आदिवासी भागातील हे कार्यालयही आता सक्षम व सुसज्ज झाले असल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

सामान्य जनतेच्या महसुली सेवेचे हे केंद्र ठरावे- महसुलमंत्री

यावेळी आपल्या उद्घाटनपर भाषणात महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संवाद साधला. ते म्हणाले, सर्व सामान्य जनतेच्या महसुली सेवा सुविधा या अधिकाधिक सुलभ व्हाव्यात यासाठी महसूल विभाग प्रयत्नरत आहे. नागरिकांच्या सातबाऱ्यापासून ते पिक पेऱ्यापर्यंत, विविध आपत्कालिन परिस्थतीच्या नियोजनापासून ते तातडीने करावयाच्या योजनापर्यंत कामाची जबाबदारी ही महसूल यंत्रणेवर आहे. यासर्व सोयी-सुविधा किनवट येथील जनतेपर्यत सुलभ पद्धतीने पोहोचविण्यसाठी ही नवीन प्रशासकीय इमारत महसुली सेवेचे प्रतिक ठरेल, असा विश्वास राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील कोरोना काळातील सर्व आव्हाने समर्थपणे पेलून जिल्ह्यात इतर विकास कामांवरही तेवढेच प्रभावीपणे काम करुन दाखविले आहे. ऑनलाइन सातबारा, 8 अ, 2016 चे फेरफार, ई-पिक पाहणी, तलाठी गावे त्यांचा सज्जा ही सर्व कामे शिस्तबध्द पद्धतीने सुरू असल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचा त्यांनी गौरव केला. यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार, आमदार भिमराव केराम यांची यथोचित भाषणे झाली.

यांची होती ऑनलाइन उपस्थिती....!

यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री अब्दूल सत्तार, आमदार भिमराव केराम दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तर नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथून जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी मंत्री डी. पी. सांवत, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने तसेच विविध विभागाचे अधिकारी पदाधिकारी यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.

हेही वाचा -माकड खांद्यावर बसल्याच्या धक्क्याने चिमुकल्याचा हृदयविकाराने मृत्यू, नांदेड जिल्ह्यातील बारड येथील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details