नांदेड- जिल्ह्यात पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. १४ जुलै पर्यंत सरासरीपेक्षा केवळ बारा टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे जवळपास ४० टक्के पेरण्या अद्याप बाकी आहेत. जिल्ह्यात पावसाने लवकर हजेरी न लावल्यास केलेल्या पेरण्या वाया जाणार असल्याचे चित्र आहे. दुबार पेरणी करावी लागणार की काय? या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
नांदेडातून पाऊस बेपत्ता; जिल्ह्यातील ४० टक्के पेरण्या अद्याप बाकीच - farmers distressed
जिल्ह्यात चांगला पाऊस न झाल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिता ग्रस्त झाला आहे.
चांगला पाऊस पडेल या अपेक्षेने शेकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. अपेक्षीत पाऊस न पडल्याने जमिनीत पुरेशी ओल मुरली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील हळद वाया गेली आहे. त्यातच पावसाअभावी उसाचे पीक देखील वाळून जात आहे. पावसाचा पत्ता नसल्याने नांदेड जिल्ह्याची वाटचाल दुष्काळाकडे होणार की काय,अशी शेतकऱ्यांकडून भीती व्यक्त केली जात आहे.
नांदेड जिल्ह्याला मृगनक्षत्राच्या पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेले उडीद आणि मुगाचे नुकसान झाले. काही प्रमाणात सोयाबीन कपाशीसह इतर पेरण्या झालेले पिक देखील पावसाअभावी धोक्यात आले आहेत. त्यामुळे पावसाने लवकर हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांना अजून नुकसान होण्याची शक्याता आहे.