नांदेड - कोरोनाच्या काळात नागरिकांची प्रशासकीय कामे ठप्प झाली आहेत. नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. जिल्हा मुख्यालयापासून दूर असलेल्या गावातील नागरिकांना कामासाठी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. या चकरा बंद व्हाव्यात व शासकीय कामे मंडळ व गावस्तरावर व्हावीत यासाठी प्रशासन आपल्या गावी हे अभियान राबविण्यात येत आहेत. यात सोळा विभागाचे खाते प्रमुख उपस्थिती राहून कामाचा निपटारा करतील. नागरिकांनी या अभियानाचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी केले.
नागरिकांच्या शासकीय कामांसाठी होणाऱ्या फेऱ्या थांबविण्याठी प्रशासन आपल्या गावी अभियान - जिल्हाधिकारी
नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. जिल्हा मुख्यालयापासून दूर असलेल्या गावातील नागरिकांना कामासाठी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. या चकरा बंद व्हाव्यात व शासकीय कामे मंडळ व गावस्तरावर व्हावीत यासाठी प्रशासन आपल्या गावी हे अभियान राबविण्यात येत आहेत.
नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. जिल्हा मुख्यालयापासून दूर असलेल्या गावतील नागरीकांना कामासाठी जिल्हा व तालुक्यातीच्या ठिकाणी यावे लागते. या चकरा बंद व्हाव्यात व शासकीय कामे मंडळ व गावस्तारावर व्हावीत यासाठी प्रशासन आपल्या गावी हे अभियान राबविण्यात येत आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत महसूल व वन विभागाच्या वतीने प्रशासन आपल्या गावी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध कार्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र, धनादेश, शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाच्या वतीने 16 तालुक्यातील मंडळ स्तरावरील गावात प्रशासन आपल्या गावी हे अभियान राबविण्यात येत आहे.
त्याच दिवशी कामाचा निपटारा व्हावा
या अभियाना विषयी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर म्हणाले की, अभियानाचा जास्तीत नागरिकांना फायदा मिळावा यासाठी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी नागरिकांचे अर्ज, अडचणी समजून घ्याव्यात. ज्या दिवशी अभियान आहे. त्या दिवशी कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच पुढील कार्यक्रमात आढावा घेण्यात यावा अशा सुचना सर्व विभाग प्रमुखांना जिल्हाधिका-यांनी दिल्या. तसेच त्यांनी प्रत्येक विभागाच्या स्टाॅलला भेट देऊन सुचना केल्या.
हदगाव तालुक्यातील सात गावांच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच संयुक्त बैठक
नागरिकांनी इंदिरा आवास योजना, संजय गांधी योजना विषयी समस्या मांडल्या. तर हदगाव तालुक्यातील अर्धापूर तालुक्यात समाविष्ट झालेल्या सात गावातील सर्व कार्यालय अर्धापूरशी जोडण्यासाठी लवकरच संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
विविध विभागाकडून विविध योजनांची माहिती
यावेळी कृषी, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, महसुल, महिला व बाल संगोपन, वन विभाग, विज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालया मार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती दिली. तसेच मृत्यू, रहिवासी, अल्प भूधारक आदी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच रमाई अर्थिक विकास महामंडळाच्या वतीने बचत गटाला धनादेश देण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे, पंचायत समितीच्या सभापती कांताबाई सावंत, उपसभापती अशोक कपाटे, तहसीलदार सुजित नरहरे यांच्यासह तालुक्यातील विविध कार्यालयातील खाते प्रमुख उपस्थितीत होते. तालुका प्रशासननाच्या वतीने अधिकारी व पदाधिका-यांचे स्वागत करण्यात आले.