हैदराबाद -सामाजिक न्याय हा फार महत्त्वाचा न्याय आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला समान म्हणून पाहिले पाहिजे. सामाजिक न्याय हा अनेक देशांच्या मूलभूत अधिकारांचा अंग आहे. जेव्हा लोक समानतेने वागतात, आनंदाने राहतात तो समाज एका बगीचासारखा फुलतो, असे मत डॉ. सूरज एंगडे यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना व्यक्त केलं. आज आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिवस. या दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील Senior Fellow, कास्ट मॅटर्स या बेस्टसेलर्स पुस्तकाचे लेखक डॉ. सूरज एंगडेंची विशेष मुलाखत घेतली. आंतरराष्ट्रीय मंचावर जे काही विचारवंत आहे, त्या प्रभावी विचारवंतांपैकी एक म्हणून सूरज एंगडेंकडे पाहिलं जातं. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्तंभलेखक अशीसुद्धा त्यांची ओळख आहे. इंग्लंड, साऊथ आफ्रिका, अमेरिका, पोर्तुगाल सह 30 देशांच्यावर त्यांचा प्रवास राहिला आहे.
1. डॉ. सुरज एंगडे, प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही भेदभावाविना समानतेने जगता यावे हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. याच न्यायाने सामाजिक न्यायाला Promote केलं जावं, या उद्देशाने या दिनाची सुरुवात करण्यात आली. तुमच्या नजरेतून सामाजिक न्यायाची व्याख्या काय?
उत्तर -भारतात जात आणि धर्म हे दोन प्रमुख कारणं आहेत, समाज बनण्यामागे. आणखी खोलात गेले तर संत, महंत. ओळख ही वेगवेगळ्या प्रकारची असते. समाजाची प्रक्रिया ही बदलत आहे. व्यक्ती बदलत असतो तसा समाजही बदलत असतो. समाजात integration पाहिजे. भारतासारख्या देशात प्रत्येक जात ही देश आहे. आपापल्या हितचिंतनासाठी ती कार्यरत आहे. समाज हा सामाजिक होईल का? तुम्ही स्वत:ला भारतीय म्हणता मग तुमच्या जातीचं, धर्माचं काय? जिथे अन्याय आहे तिथे न्याय मागतो. सामाजिक न्याय हा फार महत्त्वाचा न्याय आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला समान म्हणून पाहिले पाहिजे. सामाजिक न्याय हा अनेक देशांच्या मूलभूत अधिकारांचा अंग आहे. जेव्हा लोक समानतेने वागतात, आनंदाने राहतात तो समाज एका बगीचासारखा फुलतो.
डॉ. सूरज एंगडे यांची विशेष मुलाखत 2. डॉ. यावर्षाची थीम ही 'Achieving Social Justice through Formal Employment' म्हणजे औपचारिक रोजगारातून सामाजिक न्याय मिळवणे... याबद्दल जर विचार केला तर आधीची परिस्थिती, आताची परिस्थिती आणि भविष्यातील परिस्थिती याकडे तुम्ही कसं पाहता?
उत्तर -हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. औपचारिक रोजगार फार महत्त्वाचा आहे. मागच्या वर्षी मी एक लेख लिहिला होता, 92 टक्के अनौपचारिक तर 8 टक्के औपचारिक क्षेत्रात रोजगार आहे. अनौपचारिक मध्ये मिस्तरी लोक, भाजीपाला विकणारे, कंत्राटी कामगार, छोटेमोठे व्यवसाय करणारे येतात. सरकारकडे अनौपचारिक रोजगाराबाबत याबाबत आकडेवारी नाही. यात बहुजन समाज जास्त आहे. औपचारिक रोजगारासाठी भारताची अर्थनीती यात बदलू शकते. सरकार याकडे दुर्लक्ष यासाठी करते कारण त्यांना औपचारिक रोजगार दिला तर त्यांना संरक्षण द्यावे लागतील, त्यांचे मुले चांगल्या शाळेत जातील. मात्र, यामुळे ही अर्थव्यवस्था ही विशिष्ट जातीनिष्ठ राहिली आहे. जेव्हा मी दक्षिण आफ्रिकेत होतो तिथे मी संशोधन करत असताना, अनौपचारिक रोजगारातून देशाने महसूल मिळालेला मी पाहिला. औपचिकरिक रोजगारामुळे देशात सुव्यवस्था निर्माण होईल.
डॉ. सूरज एंगडे यांची विशेष मुलाखत 3. भारत-जात-आरक्षण- या समीकरणावर भारतातील राजकारण चालतं. जातीच्या आधारावर तिकीटं दिली जातात. जातीच्या आधारावरच मतं दिली जातात. यामुळे सरकारी असेल, खासगी असेल इतरही क्षेत्र असतील यात योग्य व्यक्तीला डावलण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आरक्षणमुक्त भारत व्हायला पाहिजे का?
उत्तर -हा खूप विस्तृत विषय आहे. जातीवरील राजकारण यासाठी बहुजन समाजाला जबाबदार ठरवले जाते. मात्र, या लोकांकडे ताकद नाही, resources नाहीत. सवर्ण वर्चवस्ववादी समाज यासाठी दोषी आहे. स्वातंत्र्यानंतर जात संपवण्यासाठीची मोहीम फार कमी लोकांनी लढवली. फुले-शाहू-आंबेडकर, संत तुकाराम महाराज यांसारखे लढवय्ये जर पाहिले, हे जातविरोधी होते. कांशीराम साहेब म्हणाले होते, लाभार्थी हे कधीच जातीव्यवस्थेच्या बाहेर निघणार नाहीत. जात संपवले तर सवर्णांकडे काही राहणार नाहीत. जात आणि राजकारण याबाबत पाहिले तर, नेहरुंनी ब्राह्मण समाजाला समाजाला जास्त तिकिटे दिली. मग हे बहुजन समाजाने केलं तर त्यांना जातीवादी ठरवलं गेलं. ते तुमच्या नजरेत यायला लागले तेव्हा जातीचं वाटोळं केलं जातंय. बहुजन समाजातील लोक स्वत:च्या अधिकारांसाठी लढायला लागले, तेव्हाही त्यांच्याबद्दल बोललं गेलं. आरक्षणाने फक्त ज्या व्यक्तीला संधी नव्हती तिथं संधी दिली गेली, त्यात काही गैर नाही. प्रत्येक वर्गाचं प्रतिनिधीत्त्व असलं पाहिजे.
डॉ. सूरज एंगडे यांची विशेष मुलाखत 4. तुमचं कास्ट मॅटर्स हे पुस्तक जगभर गाजलं. बेस्टसेलर्सच्या यादीत आलं. मराठीतही ते पुस्तक आलं. या पुस्तकामागची तुमची प्रेरणा काय?
उत्तर -मी जेव्हा ऑक्सफर्डमध्ये असताना माझी पीएचडी संपली आणि Academic Finding साठी तुम्ही Acedamic conference ला जाऊन तुमचा रिसर्च छापता. माझं पीएचडीचं प्राथमिक संशोधन हे जातीवर नाहीये. तर ते दक्षिण आफ्रिकेत भारतातील जो कामगारवर्ग आहे, गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेशातून आलेला ते काय करतात, या विषयावर आहे. मी जेव्हा गेलो तेव्हा मला जाणवलं की जात या विषयावर आतंरराष्ट्रीय स्तरावर या विषयाची मांडणी करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा मी एक फेलोशिप होती, त्यासाठी एक प्रपोजल लिहायचं होतं मग मी विचार केला की, माझा आवडीचा विषय, जो मला अस्वस्थ ठेवतो, त्याचा चिकित्सक अभ्यास करायचं ठरवलं. ही त्यामागची प्रेरणा होती.
डॉ. सूरज एंगडे यांची विशेष मुलाखत 5. वैयक्तिक प्रश्न - सूरज एंगडे या झोपडपट्टीतील मुलाला, मागासवर्गीय समाजातून आलेल्या मुलाला परदेशात जाऊन मोठं व्हावं, गरुडझेप घ्यावी, असं कधी वाटलं?
उत्तर -हा कुतूहलतेचा प्रश्न आहे. प्रेरणादायी प्रश्न आहे. भारतातील शिक्षणपद्धती मला समाधानकारक वाटली नाही. माझ्या ऊर्जेसाठी ती प्रतिसाद देणारी नव्हती. परदेशात गेल्यानंतरही मी कुठून येतो हे सांगितलं नव्हतं. म्हणून मी एक मुजोर पणाने स्वत:ची ओळख जगासमोर आणतो. हे प्रेरणादायी आहे. हे तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही स्वत:ला, परिवाराला, समाजाला, पूर्वजांना स्विकारता. भारताचा गाभा जात आहे. जात जर तुमच्या घडण्यामध्ये नसेल तर तुम्ही कोणती गोष्ट सांगता? मला वाटतं, या व्यवस्थेतून बाहेर यायचं असेल, तर घडणाऱ्यांनी, नवोदितांनी, तरुणांनी माझा जर पाहिला जो आहे, ज्याच्यातून हा व्यक्ती आला आहे, त्यात जातीने लादलेल्या गढूळपणाला कसा दूर करतोय, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
डॉ. सूरज एंगडे यांची विशेष मुलाखत 6. तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पुस्तक लिहिताय. हे पुस्तक कधीपर्यंत वाचकांच्या भेटीला येणार आहे?
उत्तर -सध्या मी पाच पुस्तकांवर काम करतोय. हे पाचही पुस्तकं वेगळ्या विषयाचं आहे. मग असं झालं की, प्रकाशकाने बोलला की बाबासाहेबांवर इंग्रजीत अधिकृत चरित्र एकही दलित समाजातील लेखकाने लिहिली नाही किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पब्लिश झाली नाही. बाबासाहेबांच्या कामावर बोललं गेलं आहे. मात्र, जीवनचरित्र नाही लिहिलं गेलं. बाबासाहेब ज्या समाजातून आले त्या जातीचा इतिहास काय, तसेच बाबासाहेबांच्या आई आणि त्यांचा परिवार यावर त्यात लिहिले जाईल. सहा पाठ झाले आहेत. त्यांचा भारतातील कालखंडावर लिखाण सुरू आहे.
डॉ. सूरज एंगडे यांची विशेष मुलाखत