महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात बोधडीत दुहेरी खून, दाढी करण्याच्या क्षुल्लक कारणावरुन सलून मालकाने केला ग्राहकाचा खून, तर संतप्त ग्राहकांनी सलून मालकाला ठेचून मारले - Double murder in Nanded district Bodhi

अर्धी दाढी झाल्यावर दाढीचे पैसे दे असे म्हणून तगादा लावल्याने, झालेल्या वादात सलून चालक व ग्राहकामध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले (dispute between customer and saloon owner). त्यानंतर सलून चालकाने आपल्या जवळील धारदार शस्त्राने ग्राहकाचा गळा कापून खून केला (Double murder incident at Bodhi in Nanded). संतप्त अज्ञात जमावाने सलूनच्या मालकाचा ठेचून खून केला (angry customers thrash salon owner to death).

नांदेड जिल्ह्यात बोधडीत दुहेरी खून
नांदेड जिल्ह्यात बोधडीत दुहेरी खून

By

Published : Sep 15, 2022, 10:50 PM IST

Updated : Sep 15, 2022, 11:00 PM IST

किनवट - सलूनमध्ये दाढी करत असताना अर्धी दाढी झाल्यावर दाढीचे पैसे दे असे म्हणून तगादा लावल्याने, झालेल्या वादात सलून चालक व ग्राहकामध्ये वाद झाला ((dispute between customer and saloon owner). वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर सलून चालकाने आपल्या जवळील धारदार शस्त्राने ग्राहकाचा गळा कापून खून केला (Double murder incident at Bodhi in Nanded). संतप्त अज्ञात जमावाने सलूनच्या मालकाचा ठेचून खून केला (angry customers thrash salon owner to death). तसेच दोन सलून चे दुकान व संबंधित सलून मालकाचे घर जाळून खाक केले.

बोधडी येथील बाजारपेठेत बुधवारी (दि.15 ) सायंकाळी साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बोधडी येथे अनिल मारुती शिंदे वय अंदाजे चाळीस वर्षे या नाभिक समाजाच्या तरुणाचे सलूनचे दुकान मार्केटमध्ये आहे. या सलूनमध्ये सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास याच गावात राहणारा व्यंकटी सुरेश देवकर (22 वर्षे) हा तरुण दाढी करण्यासाठी गेला. दाढी करत असताना अर्धी झाल्यावर देवकरला शिंदेने दाढीचे पैसे दे म्हणून मागणी केली. माझी दाढी पूर्ण कर दाढी झाल्यावर पैसे देतो, असे सांगितल्याने दोघात वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि चक्क अनिलने व्यंकटचा धारदार शस्त्राने गळा कापून खून केला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच देवकरच्या नातेवाईकांनी जमाव करून प्रथम सलूनचे दुकान जाळून टाकले व नंतर त्याचा शोध घेऊन त्याला गावाच्या भर मार्केटमध्ये ठेचून मारून खून केला. नंतर त्याचे घर ही जाळून टाकले. ही माहिती प्राप्त होताच किनवट पोलीस घटनास्थळी रवाना झाले. अग्निशामक दलाची गाडी ही घटनास्थळी पोहोचली. सध्या परिस्थिती शांत असल्याचे कळते.


याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, पोलीस निरीक्षक अभिमन्यू सोळंखी यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत. बोधडी येथे ग्रामपंचायत ची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत एकाचवेळी झालेल्या दुहेरी हत्येमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले,एवढे मात्र खरे.

Last Updated : Sep 15, 2022, 11:00 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details