महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये कोरोनाचा कहर, नागरिकांना गोंधळून न जाण्याचे खासदार पाटील यांचे आवाहन - Nanded today corona cases

प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, हिंगोली जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन सिलिंडर ऑक्सिमीटर पुरविण्यात आले आहेत. तसेच रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव अभिमन्यू काळे यांच्याकडे नांदेड हिंगोली व यवतमाळ या शेवटच्या टोकाला असलेल्या जिल्ह्याना जास्त कोटा देण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे.

गोंधळून न जाण्याचे खासदार पाटील यांचे आवाहन
गोंधळून न जाण्याचे खासदार पाटील यांचे आवाहन

By

Published : Apr 12, 2021, 8:25 AM IST

नांदेड - जिल्ह्यात रविवारी प्राप्त झालेल्या 6 हजार 679 अहवालांपैकी 1 हजार 859 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 857 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 हजार 2 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 57 हजार 610 एवढी झाली असून यातील 43 हजार 897 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर जिल्ह्यातील नागरिकांनी गोंधळून जाऊ नये, असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.

पाटील म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हिंगोली, नांदेड, यवतमाळ जिल्ह्यात याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य , पोलीस, आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे नागरीकांनी गोंधळून जाऊ नये.

दोन दिवसांत ऑक्सिजन बेडच्या ५० खाटांची व्यवस्था....!

हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी संपूर्ण यंत्रणा पोलीस प्रशासन अहोरात्र कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून असून मदत करत आहेत. रुग्णांची संख्या झपत्याने वाढत असल्याने प्रशासनाची तयारी अपुरी पडत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक जण खोट्या बातम्या आणि अपप्रचारही करत आहेत. या पार्श्वभूमीवर वसमत येथे लवकरच दोन दिवसांत ऑक्सिजन बेडची ५० खाटांची व्यवस्था, किनवट, हदगाव येथेही ऑक्सिजन बेडच्या खाटांची व्यवस्था येत्या ४ दिवसांत करण्यात येईल असेही पाटील यांनी सांगितले आहे.

सर्व प्राथमिक विभागात उपाययोजना करण्याच्या सूचना....!

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, हिंगोली जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिमीटर पुरविण्यात आले आहेत. तसेच रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव अभिमन्यू काळे यांच्याकडे नांदेड हिंगोली व यवतमाळ या शेवटच्या टोकाला असलेल्या जिल्ह्यांना जास्त कोटा देण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे.

येत्या दोन दिवसांत हजारोच्या संख्येने रेमडिसिव्हरचा पुरवठा...!

येत्या दोन दिवसात हजारोच्या संख्येने रेमडिसिव्हरचा पुरवठा होणार आहे . अशा परिस्थितीमध्ये ज्या रुग्णांचा सिटी स्कॅनचा स्कोअर १० च्या पुढे आलेला आहे, अशा रुग्णांना रेमडिसिव्हर इंजेक्शनची गरज असल्याचे मत नांदेड येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व इतरही तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. त्यामुळे कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आल्यास घाबरून जाऊ नका तसेच रेमडिसिव्हरचा काळाबाजार करणाऱ्या साठेबाजांना कारवाई करण्यासंदर्भात अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना देण्यात आली याबाबत कोणतीही अडचण आल्यास ९४२२८७१४२६,९५०३८६८६४३,९८६०२३३९६४ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती...!

आजच्या घडीला 12 हजार 382 रुग्ण उपचार घेत असून 230 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. दि. 7 ते 10 एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 996 एवढी झाली आहे.

एकूण घेतलेले स्वॅब- 3 लाख 74 हजार 158
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 9 हजार 940
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 57 हजार 610
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 43 हजार 897
एकूण मृत्यू संख्या-1 हजार 77
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.19 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-48
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-88
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-376
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-12 हजार 382
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-230

ABOUT THE AUTHOR

...view details