नांदेड -पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात उत्साहात साजरा होत आहे. देशात आणि राज्यात पहाटेपासून ठिकठिकाणी योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड येथेही शिवरत्न जिवाजी महाले चौकात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्यदिव्य योगशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात योगगुरू रामदेवबाबा योगाचे धडे देत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत.
आंतरराष्ट्रीय योगदिन : मुख्यमंत्री फडणवीसांचा रामदेव बाबा यांच्यासोबत नांदेडमध्ये योगाभ्यास - योगाभ्यास
योगगुरू रामदेव बाबा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नांदेडमध्ये योगासने केली.
मुख्यमंत्री फडणवीस आणि रामदेव बाबा
सकाळपासून देशभरात सगळीकडे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. आज नांदेडमध्ये योगगुरू रामदेव बाबा यांनी आपल्या अनुयायांसोबत योगासने केली. यावेळी या कार्यक्रमाला फडणवीसांनी उपस्थित राहून योगाभ्यास केला. यावेळी एका लाखापेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेतला.
Last Updated : Jun 21, 2019, 7:12 AM IST