नांदेड जिल्ह्यात बांधावर खते-बियाणे; शेतकरी गटामार्फत होतेय वाटप..! - नांदेडमध्ये बांधावर खते-बियाणे
शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारे बी-बीयाणे आणि रासायनिक खतं खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर गर्दी होऊ नये, म्हणून कृषी विभागाने चांगला निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना बांधावर बी-बीयाणे मिळणार आहेत.

नांदेड जिल्ह्यात बांधावर खते-बियाणे
नांदेड -आता खरीप हंगाम जवळ आला आहे. पेरणीसाठी लागणारे बी-बीयाणे आणि रासायनिक खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर गर्दी होऊ नये, म्हणून कृषी विभागाने चांगला निर्णय घेतला आहे. यावर्षी कृषी विभागाच्या आत्मायोजने अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गटांमार्फत, शेतकऱ्यांना बांधावर बी-बीयाणे आणि खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात बांधावर खते-बियाणे