नांदेड - पाच एप्रिलला नांदेडचे (Nanded News) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची हत्या करण्यात आली. दोन महिन्यांच्या तपासानंतर या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. आतापर्यंत एकूण नऊ जणांना या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. हत्या प्रकरणाला उलगडा होतो न होतो, तोच आता बियाणी कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. बियाणी कुटुंबात कलह निर्माण झाला असून संजय बियाणी यांचा भाऊ आणि त्यांची पत्नी यांनी एकमेकांविरोधात पोलिसांना तक्रारी दिल्या आहेत.
Disput in Nanded Builder Sanjay Biyani Family : संजय बियाणींच्या पत्नीने जीवे मारण्याची धमकी दिली, दिराची तक्रार - बियाणी कुटुंबात कलह
नांदेड - नांदेडचे (Nanded News) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी ( Sanjay Biyani ) यांच्या हत्येचा दोन महिन्यांनी उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, हत्येचा उलगडा होत नाही तोच बियाणी कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. बियाणी कुटुंबात कलह ( Family feud ) निर्माण झाला असून संजय बियाणी यांचा भाऊ आणि त्यांची पत्नी यांनी एकमेकांविरोधात नांदेड पोलिसांत ( Nanded Police ) तक्रारी दिल्या आहेत.
चर्चांना उधाण - या तक्रारींमुळे नांदेडमध्ये चर्चांना उधाण आले आहे. संजय बियाणींच्या भावाने संजय बियाणींच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. मला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार संजय बियाणी यांच्या पत्नीविरोधात देण्यात आली आहे. कुटुंबातील कलह थेट पोलिस ठाण्यात पोहोचल्यानं आता नवा वाद उफाळून आला आहे.
प्रवीण बियाणींनी कंपनीचा डेटा चोरला? - नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर आता बियाणी कुटुंब चर्चेत आलंय. दिवंगत संजय बियाणी यांच्या पत्नीने रविवारी रात्री आपल्या दिराच्या विरोधात चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. फायनान्स कंपनीचा डाटा संजय बियाणी यांचे भाऊ प्रवीण बियाणी यांनी चोरला, अशी तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. संजय बियाणी यांच्या पत्नीने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांच्या फायनान्सचा 1 टी.बी. डेटा प्रवीण बियाणी हे चोरी करून घेऊन गेले आहेत. प्रवीण बियाणी यांच्यावर कलम 380 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
बियाणी कुटुंबात कलह - पत्नीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार प्रवीण बियाणींनी केली आहे. परस्परविरोधी तक्रारींमुळे आता बियाणी कुटुंबातील कलह समोर आलाय. पतीचा भाऊ आणि वहिनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात गेल्यानं आता आश्चर्य व्यक्त होतंय.
हेही वाचा -अंबानींच्या होणाऱ्या सुनेचे भरतनाट्यम पाहून सर्वच झाले घायाळ, पाहा तिचे दिलखेचक फोटो