महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये दहा दिवसीय राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन - ३ जून २०१९

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दहा दिवस चालणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आज (बुधवार) सकाळी १०.३० वाजता राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले.

राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन

By

Published : Jun 5, 2019, 2:12 PM IST

नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दहा दिवस चालणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आज (बुधवार) सकाळी १०.३० वाजता राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले.

राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन
यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ५३ वर्षापूर्वी नांदेड येथे विद्यार्थी असताना एनसीसीच्या शिबिरातील सहभागाची आठवण सांगून, अशी शिबिरे आपल्याला प्रेरणा देतात आणि आपले जगणे समृद्ध करतात, असे सांगितले. हे माझेही विद्यापीठ असून हे विद्यापीठ आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.


राव पुढे म्हणाले की, भारत हा विकसित राष्ट्राच्या समूहात प्रवेश करत आहे. विकसित राष्ट्राची शिस्त, कायद्याचा आदर आणि आपत्ती व्यवस्थापनांबाबतची तत्परता, ही तीन प्रधान वैशिष्ट्ये असतात. साधे वाहतुकीचे नियम जरी पाळले तरी बरेच अपघात टळू शकतात. विद्यार्थ्यांनी शिस्त पाळून नागरी समाजाचे ‘रोल मॉडेल’ म्हणून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.


ग्लोबल वॉर्मिंग आणि भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत बोलताना ते म्हणाले की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणातील बदल, कमी होत जाणारे पाण्याचे स्त्रोत, वृक्ष लागवडीची समस्या अशी अनेक आव्हाने आपल्यापुढे उभी आहेत. २०२० साली भारत जगातील सर्वाधिक तरुणांचा देश असणार आहे आणि तो अमेरिका आणि चीन यांच्यापेक्षाही तरुण असणार आहे. आपले सरासरी वय तेव्हा २९ वर्षे असेल ही आपल्यासाठी मोठीच संधी आहे. देश महात्मा गांधी यांची १५०वी जयंती वर्ष साजरे करीत आहे. स्वच्छ भारतासाठी प्रत्येकाने पुढे यावे, ही लोक चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले.


गुरुगोविंद सिंग अध्यासन केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन करताना मला अतिशय आनंद झाला. गुरुगोविंद सिंग यांच्या पवित्रस्थानी त्यांचे अध्यासन केंद्र उभारल्या जात आहे. ही खूप आनंददायी बाब असून या इमारतीची उभारणी झाल्यावर याचे उद्घाटन माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते होण्यासाठी मी पुढाकार घेईल, अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली.
समारंभापूर्वी श्री. गुरुगोविंद सिंग अध्यासन व संशोधन केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. सोबतच, कॉमन इंस्ट्रुमेंटे फॅसिलिटी सेंटर, निमल हाऊस याचेही उद्घाटन त्यांनी केले.


या शिबिरात राज्यभरातून ११६३ राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, ७३ कार्यक्रम अधिकारी आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एन.डी.आर.एफ.) ५० जवान सहभागी झाले आहेत.
लक्षकेंद्री व आपत्ती व्यवस्थापनाचे समग्र प्रशिक्षण देणे हा 'आव्हान-२०१९' चा प्रमुख उद्देश्य आहे. या प्रशिक्षणात मानव निर्मित व नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाणे, तात्काळ प्रतिसाद देऊन हानीची तीव्रता कमी करणे, तसेच आपत्ती पीडितांना आपत्तीमधून सुखरूप मुक्त करण्यासाठीच्या उपाययोजनांची प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देणे, असे या शिबिराचे स्वरूप राहणार आहे.


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, कुलसचिव डॉ.रमजान मुलाणी, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई येथील राज्य संपर्क अधिकारी व विशेष कार्य अधिकारी डॉ.अतुल साळुंके, प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.शिवराज बोकडे, आणि ‘आव्हान-२०१९’चे समन्वयक डॉ.अविनाश कदम यांची मंचावर उपस्थिती होती.यांच्याबरोबरच या कार्यक्रमास, जिल्हाधिकारी आरून डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंगल, पोलीस अधीक्षक संजय जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे राजदूत नवेली देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.अतुल साळुंके यांनी केले. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाच्या पंचवीस वर्षाच्या वाटचालीचा संक्षिप्त लेखाजोखा आपल्या मनोगतात मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सचिन नारंगले आणि डॉ.महेश जोशी यांनी केले, तर डॉ.शिवराज बोकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details