महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे नांदेडमध्ये धिंडवडे; एमपीएससीच्या कार्यक्रमासाठी सुरक्षेविना हजारो विद्यार्थी एकत्र - आपत्ती व्यवस्थापन कायदा नांदेड

पुण्याचे गणिताचे शिक्षक सचिन ढवळे यांना रविवारी नांदेडमध्ये एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शनासाठी बोलावण्यात आले होते.

mpsc students gathered in nanded
आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे नांदेडमध्ये धिंडवडे; एमपीएससीच्या कार्यक्रमासाठी सुरक्षेविना हजारो विद्यार्थी एकत्र

By

Published : Mar 15, 2020, 8:47 PM IST

नांदेड - नांदेडमध्ये आतापर्यंत कोरोनाचे चार संशयीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र, तरीही खासगी क्लासेसवाले या आदेशाला जुमानत नसल्याचे चित्र आहे. रविवारी नांदेडमध्ये एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता सेमिनार ठेवण्यात आले होते.

आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे नांदेडमध्ये धिंडवडे; एमपीएससीच्या कार्यक्रमासाठी सुरक्षेविना हजारो विद्यार्थी एकत्र

नांदेड येथील सेमिनारमध्ये शासनाचे नियम धाब्यावर बसवले आहेत. पुण्याचे गणिताचे शिक्षक सचिन ढवळे यांना मार्गदर्शनासाठी बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमाला हजारो विद्यार्थी एकत्र आले होते, एकीकडे कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून, जिल्हा प्रशासनानाने अनेक कार्यक्रम रद्द केले आहेत. मा,त्र प्रहार संघटनेने विद्यार्थ्यांसाठी आयोजित या कार्यक्रमात हजारो विद्यार्थी सुरक्षेवीनाच एकत्र आले होते. ऐनवेळी या कार्यक्रमाबाबत प्रशासनाला माहिती मिळाली, त्यांनंतर प्रशासनाच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम बंद पाडण्यात आला. मात्र हजारो विद्यार्थी काही वेळ कुठल्याही सुरक्षेशिवाय एकत्र आल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे धिंडवडे निघाल्याचे दिसून आले.

ABOUT THE AUTHOR

...view details