महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी दिपकसिंह रावत यांची नियुक्ती - नांदेड जिल्हा बातमी

महानगरपालिकेत एकूण 81 जागा असून त्यापैकी काँग्रेस 73, सेना 1, अपक्ष 1 व भाजप 6 असे पक्षीय बलाबल आहे. 2017 मध्ये झालेल्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर जवळपास वर्षभर विरोधी पक्षनेते पद रिक्त होते.

Dipak Singh Rawat
दिपकसिंह रावत

By

Published : Jan 8, 2020, 11:42 AM IST

नांदेड- महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते पदाचा पेच महापौरांनी न्यायालयीन आदेशाच्या अधीन राहून सोडवला आहे. विरोधी पक्षनेतेपदी दिपकसिंह रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दिपकसिंह रावत, विरोधी पक्षनेते

हेही वाचा - ...अन् बालाजी सूर्यवंशी रडू लागले

महानगरपालिकेत एकूण 81 जागा असून त्यापैकी काँग्रेस 73, सेना 1, अपक्ष 1 व भाजप 6 असे पक्षीय बलाबल आहे. 2017 मध्ये झालेल्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर जवळपास वर्षभर विरोधी पक्षनेते पद रिक्त होते. जाता-जाता तत्कालीन महापौर शीला भवरे यांनी भाजपच्या नगरसेविका गुरप्रीतकौर सोडी यांची नियुक्ती केली होती. परंतु, या निवडीविरुध्द भाजपचे खासदार चिखलीकर यांच्या गटाने न्यायालयीन लढाई लढली.

हेही वाचा - नांदेडमध्ये महाविकास आघाडी पॅटर्न; काँग्रेसचे आठ, भाजपचे सहा तर शिवसेनेचा एक सभापती

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महापौर दीक्षा धबाले यांनी 6 जानेवारीला सुनावणी घेतली होती. परंतु, गुरप्रीतकौर सोडी यांनी अर्ज देऊन सुनावणी लांबणीवर टाका, असे पत्र दिल्यावर महापौरांनी अखेर भाजपचे दीपकसिंह रावत यांची मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली. तसे पत्रही महापौरांनी मंगळवारी रावत यांना दिले.

यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष प्रवीण साले, मिलिंद देशमुख, विजय गंभीरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details