तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची महाराष्ट्रात एन्ट्री नांदेड :तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची यापूर्वी नांदेडमध्ये सभा ही ठरली होती. मात्र, मराठवाडा विधान परिषदेच्या निवडणुका संदर्भात लावलेल्या आचारसंहितामुळे सभा रद्द करण्यात आली होती. पुन्हा एकदा बीआरएस ( भारत राष्ट्र समिती ) मोठ्या ताकतीने महाराष्ट्रात प्रवेश करत असून येत्या ५ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
५ फेब्रुवारीला केसीआर नांदेडमध्ये : या संवाद मेळाव्याच्या जागेचे शनिवारी पुजन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार भीमराव पाटील म्हणाले, ५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री केसीआर हे नांदेडमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम गुरूव्दाराचे दर्शन घेतील. नंतर ते नागरिकांशी संवाद साधतील, त्यानंतर बैठक होईल. आठ वर्षाच्या काळात तेलंगानाच्या सरकारचे विकासकामे पाहून बरेचजण त्यांच्याकडे आले होते. आम्ही तुमच्याकडे येतो, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. पण हे शक्य होणारा विषय नाही. राष्ट्रीय पक्ष तयार करून तुमची सेवा करू असे यावेळी केसीआर यांनी सांगितले होते.
शेतकऱ्यांसाठी काम करण्याची इच्छा :त्यानुसार पुर्वी आमचा पक्ष टीआरएस होता आता बीआरएस ( भारत राष्ट्र समिती ) झाला आहे. प्रत्येकाला विकासाकडे जाण्याची इच्छा आहे. आमचे स्लोगनच आहे 'आबकी बार किसान सरकार' फक्त फक्त शेतकऱ्यांसाठी काम करण्याची इच्छा आहे. कोणत्याही पक्षाला विरोध अथवा मदत करायची नाही. भारतातील सर्व लोकांना तेलंगणा सारख्या सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी आमची पहिली बैठक नांदेडमध्ये होणार आहे. याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यावेळी जाहीर प्रवेश होणार आहेत.
राज्य कार्यकारीणी जाहीर होणार : सभा होणार नसून पुढील जिल्हा, विभाग, राज्य कार्यकारीणी जाहीर होईल. बरेच जण संपर्कात असून त्यांची नावे आत्ता जाहीर करता येणार नाहीत. ते ५ फेब्रुवारी रोजी समोर येईल, असेही खासदार पाटील यांनी सांगितले. यावेळी आमदार ए. जीवन रेड्डी ,आमदार बल्का सुमन, आमदार जोगु रमण्णा, माजी महापौर रवींदर सिंग महाराज माजी खासदार नागेश गेडाम, आमदार हणमंत शिंदे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा -Bullet Train Tender : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची निविदा प्रक्रिया रखडणार? वाचा काय आहे कारण