नांदेड : नांदेडमधील धर्माबाद तालुक्यातील (Dharmabad taluka) २५ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि समर्थकांची नुकतीच बासरमध्ये बैठक (meeting for favor shown for joining Telangana) झाली. या बैठकीत तेलंगणा राज्यामध्ये सामील होण्याबाबत अनुकुलता दर्शविण्यात (Sarpanch and supporters of 25 gram panchayats) आली. तसेच तेलंगणा राष्ट्र पार्टीचे उमेदवार उभे करुन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जोमाने लढविण्याचा निर्धार करण्यात आला. तेलंगणातील के.सी.आर सरकारने राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात प्रवेश करताना तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाच्या माध्यमातून तेलंगणा सरकार महाराष्ट्र व देशाच्या अन्य भागात विविध योजना राबविणार आहेत.
जनतेचे प्रश्न आजही जशास तसे :धर्माबाद तालुक्यातील अनेक सरपंच व ग्रामस्थांनी तेलंगणा सरकारच्या विविध योजनांमुळे प्रभावित होत आम्हाला तेलंगणात समाविष्ट करा, अशी मागणी करत तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. राव यांची भेट घेतली होती. त्याची दखल घेत महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सीमावर्ती भागातील सरपंचांना मुंबईत पाचारण केले होते. त्यांच्या समस्या ऐकून घेत ४० कोटींचा निधीही देण्याची घोषणा केली होती. परंतु या घोषणा हवेतच विरल्या. त्यामुळे सीमावर्ती भागातील जनतेचे प्रश्न आजही जशास तसे आहेत.
जनतेचा आक्रोश :स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही सीमावर्ती भागातील गावांना अजूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने जनतेचा हा आक्रोश असल्याचे या बैठकीचे आयोजक शंकर पाटील होट्टे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील वाढता भ्रष्टाचार, रस्त्याची दूरवस्था, पाण्याचे टंचाई या सर्व गोष्टींपेक्षा तेलंगणा सरकारच्या योजना किती प्रभावशाली आहेत, आणि प्रांत रचना होण्याच्या अगोदर हा संपूर्ण परिसर निजामकालीन हैदराबाद राज्यामध्ये होता. त्यापूर्वी मुधोळ हा आपला तालुका (Nanded held meeting for favor shown) होता.