नांदेड: कोरोना झाला की जवळच्या नातेवाईकांसह मित्रपरिवारही दूर जात आहेत. अशा परिस्थितीत जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या डॉक्टरांची ही कहाणी आहे. कोरोनाकाळात रुग्णसेवा करत असताना स्वतःच्या वडीलांचा डोळ्यादेखत मृत्यू झाला आहे. तसेच वडीलांच्या पाठोपाठ घरातील तीन काकांचाही मृत्यू झाला. घरातील चार व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू होऊनही, शासकीय रुग्णालयात डॉ. मसरत सिद्धीकी ह्या सेवा देत आहेत. त्यांच्या या रुग्णसेवेचा वसा निश्चितच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची मान उंचवणारा ठरत आहे.
कोरोनामुळे वडीलासह तीन काकाचा मृत्यू होऊनही दुःख सावरत रुग्णसेवा सुरूच स्वतःचे दुःख सावरून देत आहेत सेवा
घरातील वडीलासह तीन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तरीही डॉ.मसरत या कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. स्वतःचे दुःख सावरून इतर रुग्ण व नातेवाईकांचे अश्रू पुसण्याचे महान कार्य सुरू आहे.
शासकीय रुग्णालयात मॅनेजर पदावर आहेत कार्यरत
कोरोना या आजारामुळे अनेक जण एकमेकांपासून पळ काढत आहेत. मात्र डॉक्टर मसरत या युवतीचे रुग्णाप्रती समर्पण पाहून मानवतेसाठीची तिची झुंज, बळ आणि प्रेरणा देणारी आहे. डॉक्टर मसरत या नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे डॉक्टरांसोबतच रुग्णांना सांभाळण्याचे दुहेरी काम त्या करत आहेत.
मला सेवेची प्रेरणा वडिलांकडूनच मिळाली
मला सेवेची ही प्रेरणा वडीलांकडूनच मिळालेली आहे. त्यांनी दिलेल्या प्रेरणेतून सेवेचा वसा घेवून आपण रुग्णसेवा करत असल्याचे त्या सांगतात. प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टर मसरत ह्या आपल्या कर्तव्याप्रती निष्ठेने काम करत आहेत. कोविडच्या भीषण परिस्थितीत डॉक्टर सध्या देवदूतासारखे काम करत आहेत. डॉक्टरांच्या सेवाभाव या वृत्तीमुळे शासकीय रुग्णालयातील हजारो गोर-गरीब रुग्णांना उपचारातून बरे करण्याचे महान कार्य त्या करत आहेत.
हेही वाचा -Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, आसाममध्ये भाजप चढणार सत्तेचा सोपान