महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा नियोजन समितीच्या ३१५ कोटीच्या प्रारूप आराखड्याला उपमुख्यमंत्र्याची मंजुरी - उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली २७ जानेवारी रोजी पार पडली होती. यावेळी विविध योजनांसाठी प्रस्तावित खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा सादर करताना २०२०-२१ या वर्षासाठी अतिरीक्त १५५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. यातील ६० कोटींचा निधी मंजूर करुन विभागीय बैठकीत एकूण ३१५ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीच्या ३१५ कोटीच्या प्रारूप आराखड्याला उपमुख्यमंत्र्याची मंजुरी
जिल्हा नियोजन समितीच्या ३१५ कोटीच्या प्रारूप आराखड्याला उपमुख्यमंत्र्याची मंजुरी

By

Published : Jan 31, 2020, 5:52 PM IST

नांदेड - जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. त्याच्या सादरीकरणानंतर राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यासाठी ३१५ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याची मागणी मंजूर केली आहे.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली २७ जानेवारी रोजी पार पडली होती. यावेळी विविध योजनांसाठी प्रस्तावित खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा सादर करताना २०२०-२१ या वर्षासाठी अतिरीक्त १५५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. यातील ६० कोटींचा निधी मंजूर करुन विभागीय बैठकीत एकुण ३१५ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा -शाळेत प्रवेश नाकारल्यानंतर वीरपत्नीची उद्विग्न प्रतिक्रिया; जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर मिळणार प्रवेश

या आढावा बैठकीसाठी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण, आरोग्यमंत्री राजेश टोपे, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार बालाजी कल्याणकर, राजेश पवार, विक्रम काळे, अमर राजूरकर, अप्पर मुख्य सचिव ( नियोजन ) देबाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे, तसेच जिल्ह्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमाची पॉवर पॉईंट सादरणीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details