महाराष्ट्र

maharashtra

Nanded crime : नांदेडात रिंदाच्या नावाने खंडणी मागणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात

By

Published : Aug 3, 2022, 8:05 PM IST

नांदेड शहरात ( Nanded City ) प्रतिष्ठित नागरिकांना फोन करून खंडणी मागण्याचा प्रकार चालू आहे. शहरात कुख्यात गुंड रिंदाच्या नावाने खंडणी मागणारा एका आरोपीला अटक ( Accused demanding extortion arrested ) करण्यात आली आहे.

Nanded crime
नांदेडात रिंदाच्या नावाने खंडणी मागणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड -शहरातील प्रतिष्टीत नागरीकांना रिंदाच्या नावाने फोन करुन धमकी देवून खंडणी मागण्याचे प्रकार चालु आहेत. अशीच एक घटना पोस्टे भाग्यनगर हधीत दि. दोन आँगस्ट 2022 रोजी घडली आहे. यातील एका आरोपीने आपला मोबाईल वरून एका व्यवसायीकास फोन करून तुमचा नंबर मला रिंदा साहेबांनी दिला आहे. असे म्हणुन फोन पे वर 30,000 /- रूपये व नंतर 50,000 /- रूपये टाका म्हणुन रिंदाची भिती दाखवुन खंडणीची मागणी केली आहे.

भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल - फिर्याद वरून पोस्टे भाग्यनगर गुरन 267 / 2022 कलम 385, 507 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हयातील आरोपीचा एसआयटी पथकांने शोध घेऊन आरोपी आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीच नाव देविदास गणेश गायकवाड, वय(45 ) वर्षे, व्यवसाय बेकार रा. वरवट ता. कंधार, जि. नांदेड यास ताब्यात घेतले आहे.तर पुढील तपास कामी पोस्टे भाग्यनगर यांच्या ताब्यात ( Working Posts Bhagyanagar ) दिले आहे.

हेही वाचा :Mob Lynching : गायींच्या तस्करीचा आरोप करत अमरावतीच्या एकाची मध्यप्रदेशात हत्या.. दोघे गंभीर जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details