नांदेड - खासगी शिकवणी घेणाऱ्या संघटनेच्या राज्याच्या कार्यकारीणीची बैठक आज (दि. 7 नोव्हेंबर) नांदेडमध्ये घेण्यात आली. येत्या 23 नोव्हेंबरपासून खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी या बैठकीद्वारे करण्यात आली आहे.
नऊ महिन्यापासून शिकवणी बंद असल्याने होते आहे नुकसान
गेल्या नऊ महिन्यापासून खासगी शिकवण्या बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक वातावरणाशी दुरावत चालला आहे. त्यासोबतच खासगी शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे खासगी शिकवण्या सुरू करण्यास सरकारने तात्काळ मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.