नांदेड- देशातील व्यवसायच नव्हे तर, शिक्षण क्षेत्र देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे देखील नुकसान होत आहे. अशात नीट व जेईईच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. ही मागणी रास्त असल्याची भूमिका पालंकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हान यांनी घेतली आहे. कोरोनामुळे पालाकांमध्ये काळजीचे वातवरण असून आम्ही ते समजू शकतो, अशी प्रतिक्रिया चव्हान यांनी दिली आहे.
नीट व जेईईच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी रास्त- अशोक चव्हाण - jee exam cancel demand
नीट व जेईईच्या परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. ही मागणी रास्त असल्याची भूमिका पालंकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हान यांनी घेतली आहे.

पालकमंत्री अशोक चव्हाण
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई आणि नीट या दोन्ही परिक्षा पुढे ढकलन्याची मागणी राज्यातील विद्यार्थ्यांकडून होत आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकार आपले म्हणणे ऐकूणच घेत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे, आज राज्यातील विद्यार्थ्यांनी जेईई आणि नीट या दोन्ही परीक्षांच्या अॅडमिट कार्डची होळी करून आपला संताप व्यक्त केला आहे.