महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अन्न आणि पाण्याच्या शोधात आलेल्या हरिणीने ठोकला गावातच मुक्काम - गावकरी

चिंचाळा गावात पाणी व खाद्याच्या शोधात एका हरिणीने चिंचाळा या गावात मागील २ महिन्यांपासून मुक्काम ठोकला आहे.

अन्न आणि पाण्याच्या शोधात आलेल्या हरणीने ठोकला गावातच मुक्काम

By

Published : Mar 31, 2019, 11:06 PM IST

नांदेड- भोकर तालुक्याला मोठा जंगल परिसर लाभलेला आहे. दरम्यान, उन्हामुळे या जंगलातील उपलब्ध पाणीसाठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाणी व खाद्याच्या शोधात एका हरिणीने चिंचाळा या गावात मागील २ महिन्यांपासून मुक्काम ठोकला आहे.

भोकर तालुक्याला मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र लाभलेले आहे. या वनात अनेक वन्यप्राणी आढळून येतात. मार्च महिना संपत आला असून भोकर तालुक्यातील अनेक गावांमध्ये भरपूर पाणी टंचाई आहे. अशातच जंगलातीलही अनेक नदी, नाले काही महिन्यांपूर्वीच कोरडेठाक पडले आहेत. जंगलात पाणी आणि खाद्य मिळत नसल्यामुळे अनेक जंगली किंवा हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीत प्रवेश करत असतात. अशाच प्रकारे चिंचाळा या गावात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून एक हरीण (मादी) अन्न आणि पाण्याच्या शोधत आली होती. त्यानंतर या हरिणीने गावातच मुक्काम ठोकला. गावकरीही या हरिणीला कुठलीही इजा पोहोचू नये, याची काळजी घेऊन तितक्याच मायेने तिला वेळेवर अन्न आणि पाणी पुरवित आहेत.

गावात मुक्काम ठोकलेली ही हरीण दरदिवशी प्राथमिक शाळेच्या परिसरात फेरफटका मारून रोजच्या सवयीप्रमाणे शाळेत जाऊन आपली तहान भूक भागवित असते. मागील काही दिवसांपासून गावात मुक्काम ठोकलेल्या या हरिणीचा गावकऱ्यांना लळा लागला असून गावकरीही मोठ्या कौतुकाने या हरिणीच्या गोष्टी सांगत असलेले या गावात ऐकायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details