महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' विशेष - उत्पादन खर्च ही निघत नसल्याने शेतकऱ्याने कोबीच्या शेतात सोडली जनावरे - शेतकरी आर्थिक संकटात नांदेड

जिल्ह्यात टाळेबंदी करण्यात आल्याने भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. भाजीपाल्याला दर मिळत नसल्याने उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. कोबी आणि टोमॅटोला तर 2 रुपये किलो दराने देखील कोणी खरेदी करत नसल्याने, भाजीपाल्यात जनावरे सोडण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

उत्पादन खर्च ही निघत नसल्याने शेतकऱ्याने कोबीच्या शेतात सोडली जनावरे
उत्पादन खर्च ही निघत नसल्याने शेतकऱ्याने कोबीच्या शेतात सोडली जनावरे

By

Published : Mar 29, 2021, 7:48 PM IST

नांदेड -जिल्ह्यात टाळेबंदी करण्यात आल्याने भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. भाजीपाल्याला दर मिळत नसल्याने उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. कोबी आणि टोमॅटोला तर 2 रुपये किलो दराने देखील कोणी खरेदी करत नसल्याने, भाजीपाल्यात जनावरे सोडण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण भागातील स्थानिक बाजारांवर झाला आहे. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच खराब होऊन चालला आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनची टांगती तलवार असल्याने शेतकऱ्यांना आपला भाजीपाला कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.

शेतकऱ्यांने पिकात सोडली जनावरे

अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील शेतकरी पांडुरंग तरोडकर यांनी वीस गुंठ्यांमध्ये पत्तकोबी, वीस गुंठ्यांमध्ये टोमॅटो तर वीस गुंठ्यांमध्ये कोथिंबिरीची लागवड केली होती. ही सर्व पिके काढणीस आली, मात्र अचानक जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाल्याने भाजीपाल्यासाठी खरेदीदारच मिळाला नाही. शेवटी या पिकात जनवारे सोडण्याची वेळ शेतकरी पांडुरंग तरोडकर यांच्यावर आली आहे. कोबी आणि टोमॅटोचे दर कमी झाल्याने, त्यातून उत्पादन खर्च देखील निघाला नसल्याचे तरोडकर यांनी यावेळी सांगितले.

उत्पादन खर्च ही निघत नसल्याने शेतकऱ्याने कोबीच्या शेतात सोडली जनावरे

भाजीपाल्याला कवडीमोल भाव

नांदेड जिल्ह्यात पत्तकोबी, टोमॅटो, कोथिंबीर अशा भाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सर्वच भाज्यांच्या दरामध्ये घट झाली आहे. कोबी सध्या 2 रुपये किलोने विकला जात आहे. तर टोमॅटोच्या 20 किलो कॅरेटला अवघा 20 ते 25 रुपयांचा भाव मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने अखेर पिकात जनावरे सोडण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया शेतकरी पांडुरंग तरोडकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details