नांदेड - बिलोली तालुक्यातील बामणी येथे ३ सप्टेंबरला सायंकाळी शेतात विजेच्या धक्क्याने बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रजनीकांत गेटकेवार (वय ३८) आणि प्रशांत गेटकेवार (वय १७), अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
विजेच्या धक्क्याने बाप-लेकाचा मृत्यू; बिलोली तालुक्यातील बडूर गावातील घटना - rajnikant getkewar
बिलोली तालुक्यातील बामणी येथे ३ सप्टेंबरला सायंकाळी शेतात विजेच्या धक्क्याने बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रजनीकांत गेटकेवार (वय ३८) आणि प्रशांत गेटकेवार (वय १७) अशी मृतांची नावे आहेत.

रजनीकांत आणि प्रशांत दोघे शेतात नारळ फोडण्यासाठी गेले होते. परंतु ते ज्या शेतात गेले होते. शेतात पिकांचे जंगली जनावरांपासून रक्षण करण्यासाठी तारांच्या कुंपनातून वीज प्रवाह सोडण्यात आला होता. गेटकेवार यांच्या चुलत्याचे शेत असल्याने याची कल्पना पिता-पुत्रांना नव्हती. दाघे शेतात असताना धुऱ्यावर पाय घसरल्याने रजनीकांत यांना विजेचा धक्का बसला. हे पाहून मुलगा प्रशांत विजेची तार दूर करण्यासाठी गेला असता त्यालाही धक्का बसला. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती.