नांदेड -अबचलनगर येथील ५६ वर्षीय रुग्णांचा मृत्यू झाला असून त्याचा स्वॅब पाठवला असता कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. नांदेडमधील चौथा मृत्यू असून बुधवारी रात्री साडे सातपर्यंत ३२ पैकी २३ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील २२ अहवाल निगेटिव्ह तर एक पॉझिटिव्ह आल्यामुळे नांदेडमध्ये दिलासादायक वातावरण असताना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
शासकीय रुग्णालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार बुधवारी 6 मे रोजी 32 अहवाल प्रलंबित होते. मात्र, रात्री साडे सातच्या अहवालानुसार 23 अहवाल प्राप्त झाले असून पैकी 22 संशयित व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. नांदेड शहरातील अबचलनगर येथील रहिवासी 56 वर्षीय पुरुष रुग्णाचा अहवाल हा पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. या रुग्णास एन. आर. आय. यात्री निवास येथे दि. 03 मे पासून अलगीकरण कक्षात दाखल करून त्यादिवशीच स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्या अहवालाचा निष्कर्ष निघाला नव्हता.