घडलेल्या घटनेविषयी सांगताना विद्यार्थिनीचे पालक नांदेड: जि. प. प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहाराची खिचडी वाटप करण्यात आली. (Dead Calf Found in Khichadi) आजचा मेनू हरभरा डाळ व खिचडी होती. ही खिचडी काही विद्यार्थ्यांनी शाळेतच खाल्ली. तर काही जणांनी घरी डब्यात भरून घरी घेऊन जाऊन खाल्ली. (dead calf found in school nutrition) त्यातील पहिलीत शिक्षण घेणारी आरुषी बेटकर या विद्यार्थिनीला खिचडीत मृत पाल आढळली.
माझी मुलगी पहिल्या वर्गात शिकत आहे. शाळेमध्ये आल्यानंतर तिला खाऊवाटप झाला. ती खाऊ घेऊन घरी आली असता त्यात आम्हाला मृत पाल आढळून आली. त्यामुळे आम्ही ती पाल आणि खाऊ घेऊन शाळेत पोहोचलो. यात शाळेतील कर्मचाऱ्यांची निष्काळजी जाणवत आहे. -- शिवशंकर बेटकर, विद्यार्थिनीचे पालक
अन् चिमुकले जिवाच्या आकांताने रडू लागले:आरुषीचे वडील शिवशंकर बेटकर हे घरीच असल्याने त्यांनी ही मृत पाल मुख्याध्यापक, शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. थोड्याच वेळात त्यातील खिचडी खालेल्या काही विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे चिमुकले रडू लागले. त्यातील २१ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कापसी येथे तर त्यानंतर पाच जनांना नांदेड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता या सर्व विद्यार्थ्यांची तब्येत ठीक आहे. विषबाधेच्या घटनेनंतर जि.प. शाळेच्या परिसरात जमलेल्या पालकांनी मुख्याध्यापकांना जाब विचारला.
काही विद्यार्थ्यांनी शाळेत बसून खिचडी खाल्ली. तर काही विद्यार्थ्यांनी आपापल्या डब्यात घरी जाऊन खिचडीचा आस्वाद घेतला. सर्व विद्यार्थ्यां उपचार सुरू आहेत.-- चक्रधर शिंदे, मुख्याध्यापक जि.प. प्रा. शाळा, वाळकी बुद्ध
विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर:विषबाधित विद्यार्थ्यांना कापशी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. मुनेश्व व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले. या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. आरोग्य विभागाचे पथक शाळेत येऊ उर्वरित विद्यार्थ्यांवर उपचार करीत आहे. रुग्णालयाता दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे वैद्यकीय परिक्षण करण्यात आले. यानंतर 4 तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले गेले. त्यांच्या प्रकृतीत गंभीर बाब न आढळल्याने चिमुकल्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली, अशी माहिती स्थानिक डॉक्टरांनी दिली.