महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अर्धापूर तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे' - अर्धापूर तालुका

अर्धापूर तालुक्यातील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे, या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

अर्धापूर तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, यासाठी नायब तहसिलदारांना निवेहन

By

Published : Sep 28, 2019, 7:32 PM IST

नांदेड -जिल्ह्यातील अनियमित व खंडीत पावसामुळे खरीपांच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. यात जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान हे अर्धापूर तालुक्यात झाले असून, येथील शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

अर्धापूर तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, शिवसेनेची मागणी

अर्धापूर तालुक्यातील झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाने लवकरात लवकर सर्वेक्षण करावे. तसेच सरकारने येथील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे.

हेही वाचा...महाराष्ट्र बोलतोय... पाच वर्षांनंतरही गडचिरोलीतील बोदली गावातील समस्या कायम

अर्धापूर तालुका नायब तहसीलदारांना शिवसेनेकडून मागणीचे निवदेन

तालुक्यातील पावसाच्या लहरीपणाचा फटका खरीपातील सोयाबीन, मुग,उडीद यासह अन्य पिकांना बसला आहे. त्याचा परिणाम शेती उत्पन्नावर होत आहे. तसेच पिकांचेही खूप मोठे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने अर्धापूर तालुका नायब तहसीलदार डी. एन. जाधव यांना देण्यात आले आहे. यावेळी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता पाटील पांगरीकर, पंचायत समिती सदस्य अशोक कपाटे, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष कपाटे आदी सदस्य उपस्थीत होते.

हेही वाचा... महाराष्ट्र बोलतोय : औरंगाबादचे नवमतदार म्हणतायत, 'निवडणूक ही मूलभूत प्रश्नांवर व्हावी'

ABOUT THE AUTHOR

...view details