महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लॉकडाऊन इफेक्ट' : दुधाला मिळतोय पाण्याचा भाव, दुग्धउत्पादक शेतकरी अडचणीत - शेती विषयक बातम्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे दुधाच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

file photo
संग्रहीत छायाचित्र

By

Published : Jun 11, 2020, 10:54 AM IST

Updated : Jun 27, 2020, 3:39 PM IST

नांदेड - शेतीला जोडधंदा असणारा दुग्धव्यवसाय आता शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे. दुधाला सध्या सरासरी 22 रुपये प्रति लिटर इतका अत्यल्प भाव मिळत आहे. तर गुरांना लागणारा चारा आणि इतर खाद्यांंचे दर भडकलेले आहेत. त्यामुळे दुग्धव्यवसाय आता न परवडणारा धंदा झाला आहे. लॉकडाऊनमुळे दुधाचा व्यवसाय मोडकळीस आला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरीही अडचणीत आला आहे. दुधाचे दर प्रति लिटर तब्बल 12 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे पाण्याच्या भावात दूध विकले जात आहे. दूध उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.

आपल्या व्यथा मांडताना दुग्ध उत्पादक शेतकरी

शेतीला जोडधंदा म्हणून बळीराजा शेतकरी हा दुग्ध व्यवसायाकडे वळला. मात्र, आता हाच दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. संपूर्ण देशभरात कोरोनाने थैमान घातल्याने देशात टाळेबंदी जाहीर झाली आहे. याचा सर्वाधिक फटका दूध उत्पादक शेतकर्‍यांना बसला असून दुधाचे खरेदी दर हे खासगी डेअऱ्यांनी तब्बल 12 रुपयांनी कमी केले आहेत. दुधाचे दर हे 32 रूपये प्रति लिटर वरुन थेट आता 20 रुपये प्रति लिटरवर आले आहेत.

जनावरांना लागणाऱ्या खुराकाच्या वाढलेल्या किंमती आणि चार्‍याचा विचार केला तर शेतकऱ्यांना एक लिटर दूध उत्पादनासाठी तब्बल 25 ते 30 रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, हेच दूध सध्या 20 रुपये लिटरने विकले जात असल्याने शेतकऱ्यांना लिटरमागे तब्बल दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. दुसरीकडे जनावरांना लागणारा खुराकही टाळेबंदीमुळे वेळेवरत मिळत नसल्याने दुधामध्ये मोठ्या प्रमाणात घट येत असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. साधारणपणे एका जनावरांला अडीचशे आसपास खर्च येत असून केवळ दोनशे रुपयांचे दूध होत आहे. दूध व्यवसाय संपूर्णता डबघाईस आला असून सरकारने आम्हाला मदत द्यावी, अशी मागणी नांदेड तालुक्यातील पिंपरी महिपाल येथील शेतकरी आबाजी जोगदंड, रुखमाजी जोगदंड यांनी केली आहे.

हेही वाचा -सहाय्यक लेखा अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Last Updated : Jun 27, 2020, 3:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details