नांदेड - कौठा परिसरातील एका घरातून शस्त्रसाठा जप्त करण्यात आली आहेत. यात तलवारी, खंजीर अशा ३० हत्यारांचा समावेश आहे. याप्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडमध्ये सापडला अवैध शस्त्रसाठा, पोलिसांनी घेतले एकास ताब्यात - police
या छाप्यात २८ खंजीर, १ तलवार आणि एक अर्धवट बनवलेली तलवार असे शस्त्र सापडून आले. या ठिकाणी ठाकूरसिंग देशमुखसिंग टाक ही व्यक्ती आढळून आली. जी शस्त्रे बनविण्याचे काम करते.
शुक्रवारी गस्त घालत असताना नांदेड पोलिसांना शस्त्रसाठ्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी किशनसिंग भगवानसिंग बावरी याच्या घरी छापा टाकला. या छाप्यात २८ खंजीर, १ तलवार आणि एक अर्धवट बनवलेली तलवार असे शस्त्र सापडून आले. या ठिकाणी ठाकूरसिंग देशमुखसिंग टाक ही व्यक्ती आढळून आली. जी शस्त्रे बनविण्याचे काम करते.
ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक शेख जावेद, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक एकनाथ देवके, पोलीस कर्चमचारी रामचंद्र पवार, पद्मसिंह कांबळे, रेवणनाथ कोळनुरे, सुरेश पुरी यांनी केली. ठाकूरसिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.