नांदेड - जिल्ह्यात सोमवार 19 ऑक्टोबरला सायंकाळी 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 212 कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 101 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 26 तर अँटिजेन किट्स तपासणीद्वारे 75 बाधित आले. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 92.29 टक्के आहे.
आजच्या एकुण 413 अहवालापैकी 287 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 18 हजार 180 एवढी झाली असून यातील 16 हजार 130 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 446 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील 45 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
या अहवालात पाच जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. रविवार 18 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंधार तालुक्यातील कौठा येथील 82 वर्षाचा पुरुषाचा, लोहा तालुक्यातील वडेपुरी येथील 72 वर्षाचा पुरुषाचा, देगलूरनाका नांदेड येथील 52 वर्षाचा पुरुषाचा, सोमवार 19 ऑक्टोंबर रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे शिवाजीनगर कंधार येथील 60 वर्षाचा पुरुषाचा, नांदेड बसवेश्वरनगर 54 वर्षाचा एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 488 झाली आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 20, हिमायतनगर तालुक्यात 1, मुदखेड 1, नांदेड ग्रामीण 2, भोकर 1, माहूर 1 असे एकुण 26 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 68, लोहा तालुक्यात 1, देगलूर 1, परभणी 1, नांदेड ग्रामीण 1, किनवट 2, धर्माबाद 1 असे एकूण 75 बाधित आढळले. जिल्ह्यात 1 हजार 446 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.
सोमवार 19 ऑक्टोंबर रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 50, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 90 एवढी आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.29 टक्के; 101 नवे पॉझिटिव्ह, पाच जणांचा मृत्यू - नांदेड कोरोनावर मात बातमी
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 20, हिमायतनगर तालुक्यात 1, मुदखेड 1, नांदेड ग्रामीण 2, भोकर 1, माहूर 1 असे एकुण 26 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 68, लोहा तालुक्यात 1, देगलूर 1, परभणी 1, नांदेड ग्रामीण 1, किनवट 2, धर्माबाद 1 असे एकूण 75 बाधित आढळले. जिल्ह्यात 1 हजार 446 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.
एकुण घेतलेले स्वॅब- 99 हजार 552
निगेटिव्ह स्वॅब- 78 हजार 133
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 18 हजार 180
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 16 हजार 130
एकूण मृत्यू संख्या - 488
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 92.29 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-8
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 5
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 379
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 446
आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 45